आसाममध्ये घडली विचित्र घटना, शेळीनं मानवी चेहरा असलेल्या पिल्लांना दिला जन्म

ही विचित्र घटना एका शेळीसोबत घडली आहे. आसाममधील कचार जिल्ह्यातील (Kachar district) एका गावात एका शेळीने (Goat) विकृत करड्यांना जन्म दिला आहे. या करड्यांचा रुप मात्र पूर्णत: मानवाचं होतं, यामुळे येथील नागरिकांना धक्का बसला आहे.

Goat gives birth to baby with 'human face'
आसाममध्ये घडलं विचित्र; शेळीनं दिला वेगळ्याच करड्यांना जन्म   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • असामन्य दिसणाऱ्या प्राण्याचा जन्म झाल्यास स्थानिक लोक त्याला पूर्वजांचा पुनर्जन्म असल्याचे मानतात.
  • शेळीच्या करड्याला माणसासारखे डोळे, नाक आणि तोंड होते.
  • जन्मानंतर काही मिनिटात मृत पावले मानवी रुपी करडे

आसाम :  जगात अनेक विचित्र घटना घडत असतात. या घटनांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या जात असतात. आसाममध्येही (Assam) अशीच एक विचित्र घडली आहे, ही घटना पाहून तेथील नागरिकांना धक्का बसला आहे. ही विचित्र घटना एका शेळीसोबत घडली आहे. आसाममधील कचार जिल्ह्यातील (Kachar district) एका गावात एका शेळीने (Goat) विकृत करड्यांना जन्म दिला आहे. या करड्यांचा रुप मात्र पूर्णत: मानवाचं होतं, यामुळे येथील नागरिकांना धक्का बसला आहे. म्हणजे या करड्यांचा चेहरा हा माणसासारखा होता. अशी विचित्र घटना आसाममधील धोलाई विधानसभा मतदारसंघातील गंगापूर गावात ही घटना घडली आहे.

शेळीच्या करड्याला माणसासारखे डोळे, नाक आणि तोंड होते. त्याचे कान बकरीच्या कानासारखे होते. त्याला दोन हातपाय होते आणि शेपटी नव्हती. जन्मावेळी त्याच्या अंगावर केसदेखील नव्हते. दरम्यान शंकर दास यांच्या मालकीच्या शेळीने आणखी एका करड्याला जन्म दिला. जे सामान्य आणि निरोगी होतं. याविषयीचे वृत्त सेंटिनेल आसामने दिले आहे. शेळीला विद्रुप बाळाच्या जन्माची बातमी पसरताच स्थानिकांनी बकरीचं मानवी रुपी करडं पाहण्यााठी मालकाच्या घरी गर्दी केली होती. दरम्यान जन्मानंतर काही वेळातच या मानवी रुपी करड्याचा मृत्यू झाला आणि त्याला दफन करण्यात आले. 

घडलं विचित्र, शेळीनं जन्म दिला वेगळ्याच करड्यांना

अशीच एक विचित्र घटना जुलैमध्ये पश्चिम बंगालमध्ये घडली होती. येथे एका शेळीने आठ पाय आणि दोन नितंब असलेल्या करड्याला जन्म दिला होता. या बकरीचा जन्म पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोनगाव येथील कलमेघ परिसरात झाला होता. परंतु या बकरीचाही जन्म झाल्यानंतर काही मिनिटांतच मृत्यू झाला होता.  एप्रिलमध्ये, गुजरातमध्ये मानवासारखा चेहरा असलेल्या बकरीचा जन्म झाल्यानंतर त्या बकरीची देवासारखी पूजा करण्यात आली होती.

या शेळीचा जन्म गुजरातमधील सोनगड तालुक्यातील तापी नदीच्या काठावर असलेल्या  सेलतीपाडा गावात झाला होता. या प्राण्याला शेळीसारखे चार पाय आणि दोन कान होते, तथापि, शेळीचे बाकीचे शरीर मनुष्यासारखे होते. त्यात कपाळ, डोळे, तोंड आणि दाढीचे काही भाग होते जे माणसांसारखे दिसतात. शेळीच्या करड्याला शेपूट नव्हती. दरम्यान, असामान्य दिसणारा प्राणी केवळ 10 मिनिटे जगतो. स्थानिक लोक बकऱ्याला दफन करण्यापूर्वी त्याची पूजा करतात, ते त्यांच्या पूर्वजांचा पुनर्जन्म असल्याचे मानतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी