Viral Video : बापरे, ब्रेक फेल झाला आणि मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले

goods train derailed in gurpa station between koderma and gaya viral video : भारतात बिहारमध्ये गया जवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

goods train derailed in gurpa station between koderma and gaya
मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले 
थोडं पण कामाचं
  • ब्रेक फेल झाला आणि मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले
  • बिहारमध्ये घडली घटना
  • कोळसा घेऊन झारखंडमधून बिहारमधील गयाच्या दिशेने जात होती मालगाडी

goods train derailed in gurpa station between koderma and gaya viral video : भारतात बिहारमध्ये गया जवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत एक मालगाडी दिसत आहे. कोळसा घेऊन वेगाने जात असलेल्या या मालगाडीचे ब्रेक फेल झाले. गाडी थांबण्याऐवजी पुढे सरकत गेली. थोड्याच वेळात एका मागून एक या पद्धतीने मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले. एक मालडबा इंजिनला जोडलेला होता. हा डबा तेवढा इंजिनच्या मागे राहिला. ब्रेक लागत नव्हता. इंजिन वेगाने पुढे जात होते. यामुळे बघणाऱ्यांना एका मालडब्याची इंजिनसोबत सुरू असलेली फरफट दिसत होती.

बिहारमध्ये गया जवळ गुरपा स्टेशन आहे. या गुरपा स्टेशन जवळ मालगाडीच्या अपघाताची घटना घडली. रुळावरून घसरलेली मालगाडी झारखंडमधील कोडरमा येथून बिहारमध्ये गयाच्या दिशेने जात होती. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. पण मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले. यामुळे या भागातील रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. रेल्वेची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. ब्रेक न लागल्यामुळे पुढे सरकत गेलेले इंजिन थांबविण्यात आले आहे. रुळावरून घसरलेले मालडबे उचलण्याचे काम सुरू आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपघातामुळे मालडब्यांमधून जमिनीवर पडलेला कोळसा पुन्हा मालडब्यांमध्ये भरण्याचे काम पण वेगाने सुरू आहे. 

युनिलिव्हरला ग्रहण !, Dove आणि Tresemme Shampoo मुळे कॅन्सरचा धोका

Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स

मालगाडी घसरल्यामुळे या भागातील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या उशिराने धावत आहेत. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. अपघात ज्या मार्गावर झाला तो मार्ग दिल्ली-हावडा रेल्वे लाइनचा भाग आहे. यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

याआधी 24 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात चांदूर येथे एका मालगाडीचे 20 डबे रुळावरून घसरले होते. या अपघातामुळे काही तासांसाठी मुंबई ते नागपूर या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच रविवार 23 ऑक्टोबर 2022 रोजी उत्तर प्रदेशमधील रमवा स्टेशन जवळ एका मालगाडीचे 23 डबे रुळावरून घसरले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी