Dowry Video : नववधूची लग्नमंडपात दादागिरी, नवऱ्याकडून घेतला हुंडा, पैसे कमी दिल्यामुळे बोहल्यावर केला राडा

एका नववधूने आपल्याला सरकारी नोकरी असल्याचं सांगत तिच्या पतीकडे हुंडा मागितला. हुंड्यात ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे असल्याचं पाहून स्टेजवरच राडा केला.

Dowry Video
हुंडा कमी दिल्यामुळे नववधुची नवरदेवावर दादागिरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नववधूने मागितला हुंडा
  • पैसे मिळाले नाहीत तर लग्न मोडण्याची धमकी
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Dowry Video : हुंडा ही अघोरी पद्धत भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात सुरू असल्याचं दिसतं. आधुनिक शिक्षणानंतर काहीजण शहाणे झाले असून त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध केला असला तरी आजही अनेक लग्न ही हुंड्याची बोली लावूनच होत असल्याचं आपण पाहतो. पण साधारणपणे नवरा हा होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबीयांकडून हुंडा घेत असतो. मुलीने मुलाकडून हुंडा घेण्याची प्रथा काही अपवाद सोडता फारशी कुठे दिसत नाही. त्यात मुलाला सरकारी नोकरी असेल तर त्याचा भाव फारच वाढतो आणि तो वाटेल तेवढा हुंडा मागू लागतो. हुंडा दिल्याशिवाय आपल्या मुलीला सुखाने संसार करता येणार नाही, अशी खूणगाठच मनाशी बांधलेले तिचे आईवडील काहीही करून मुलाला हुंडा देण्याची सोय करतात. 

मुलीने मागितला हुंडा

जर का मुलीने मुलाला हुंडा मागितला आणि हुंडा न दिल्यामुळे लग्न मोडण्याची भाषा केली, तर तुम्ही काय म्हणाल? नक्कीच सर्वांना आश्चर्य वाटेल. असाच आश्चर्याचा धक्का देणारा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नववधून तिच्या होणाऱ्या पतीसोबत स्टेजवर बसलेली दिसते. वधूने घुंगट चेहऱ्यावर ओढून घेतला आहे. त्यामुळे तिचा चेहरा दिसत नाही. तिच्या शेजारी तिचा होणारा पती अर्थात नवरदेव बसला आहे. नवरदेव अगदी गांगरून बसला असून आपल्यामुळे नवववधू नाराज होऊ नये, याची तो पुरेपूर काळजी घेत असल्याचं व्हिडिओत दिसतं. 

अधिक वाचा - "सत्ता मे आता हू, समझ मे नही" भाजपच्या मास्टर स्ट्रोकनंतर भन्नाट मीम्सचा पाऊस

हुंड्यासाठी दंगा

आपल्याला आपल्या पतीच्या कुटुंबीयांकडून हुंडा देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. मात्र ठऱलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम आपल्या हातात आली असून उरलेली रक्कम मिळाल्याशिवाय लग्न कऱणार नाही, असा पवित्रा ती घेते. त्यावर व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती नववधूला तिच्या पेशाबाबत विचारते. आपण सरकारी शाळेत शिक्षिका आहोत, असं ती सांगते. आपला होणारा पती कुठल्याशा खासगी कंपनीत छोट्या पदावर कामाला आहे. त्यामुळे आपण हुंडा घेणारच, असं ती म्हणते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

जर हुंडा दिला नाही, तर हे लग्न आपण मोडू आणि अख्खं वऱ्हाड घेऊन माघारी निघून जाऊ, अशी धमकी ती देते. तिचा पती हात जोडून तिला विनवणी करत राहतो, असं या व्हिडिओत दिसतं.

अधिक वाचा - OMG: ढगांच्या आड आकाशात उडणारं असं आलिशान हॉटेल पाहिलंय का?, लक्झरी सुविधा पाहून व्हाल दंग

खरा व्हिडिओ की सामाजिक संदेश

सामाजिक संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ तयार कऱण्यात आला असवा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र हुंडा घेणं ही पद्धतच वाईट असल्यामुळे तो मुलीने किंवा मुलाने कुणीही घेणे चुकीचेच आहे, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी