मुंबई : 63 वर्षीय महिला म्हटलं की डोळ्यासमोर असे चित्र उभे राहते, ज्यामध्ये एक वृद्ध महिला एकतर घरात विश्रांती घेत असेल किंवा शेजारच्या म्हाताऱ्या बायकांशी गप्पा मारत असेल किंवा अध्यात्माकडे वळलेली असेल. पण मुंबईतील एका ६३ वर्षीय महिलेने लोकांचा हा गैरसमज मोडीत काढला आहे. या महिलेला पाहून तुम्हाला ना ती 63 वर्षांची आहे असे वाटणार नाही आणि ना तिचा डान्स कोणत्याही पॉप गर्लपेक्षा कमी आहे. जगात नक्कीच कमी लोक असे नृत्य करू शकतील. या एका 63 वर्षीय आजीने 'चका चक' गाण्यावर डान्स केला, या व्हिडिओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. (grandmothers chaka chak dance steps in new viral video)
देसी दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रवि बाला शर्मा या महिलेचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. या देसी दादी अनेकदा बॉलिवूड गाण्यांवर डान्सचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसतात. आता त्यांनी अभिनेत्री सारा अली खानच्या 'चका चक' या लेटेस्ट गाण्यावर डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या डान्स व्हिडिओची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये 63 वर्षीय रवी बाला शर्मा हिरव्या रंगाच्या साडीमध्ये सारा अली खानप्रमाणे स्टेप्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्या मूळ गाण्याप्रमाणेच स्टेप्स करताना दिसत आहे, जे खूपच प्रेक्षणीय आहे
देसी दादीच्या अभिव्यक्तीने लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणू शकाल की वयाच्या ६३ व्या वर्षीही कोणी इतका चांगला डान्स कसा करू शकतो. या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्सद्वारे नेटिझन्स रवी बाला शर्माचे कौतुक करत आहेत. व्हिडिओवर एका व्यक्तीने लिहिले, 'खूप आनंद झाला. राधे राधे.' दुसर्या व्यक्तीने लिहिले, 'तुम्ही खूप सुंदर आणि अप्रतिम नृत्य केले आहे, आंटी.
रवी बाला शर्माच्या डान्स व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. 'चका चक' हे गाणे सारा अली खानच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटातील आहे. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष देखील काम करत आहेत. श्रेया घोषालने हे गाणे आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे तर ए आर रहमानने संगीत दिले आहे.