नवी दिल्ली : सध्या लग्न(marriage) सराईचा सीझन (Season) सुरू असून या सीझनमध्ये तुमचे पायही एका ठिकाणी राहत नसतील. नेहमी कुठली ना कुठली निमंत्रण पत्रिका तुम्हाला आलेली असेल. या लग्न सराईच्या चर्चा आता सोशल मीडियावर (social media) जोरदार होत असतात. परंतु तेथील आलेल्या कॉमेडी (comedy) व्हिडिओमुळे (Video), शिवाय हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात. कधी कधी वधू-वर मस्ती करताना दिसतात. तर कधी-कधी दोघेही रडत असतात. परंतु प्रसिद्ध कॉमेडियन (comedian) आणि अभिनेता (Actor) सुनील ग्रोव्हरने (Sunil Grover) लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला WWE ची नक्कीच आठवण येईल. नववधूने तिच्या भावी नवऱ्याला मिठाई खाऊ घालताच संतापलेल्या वराने वधूच्या चेहऱ्यावर चापटांचा पाऊस पाडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वर वधूच्या स्टेजवर जातो, तेव्हा रागावलेली वधू वराला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. नवरदेव ती मिठाई खाण्यास वेळ लावत असल्याने वधू त्याचा चेहऱ्यावर मिठाई चोपडून टाकते. त्यामुळे रागावलेला वर जोर-जोरात वधूच्या गालावर जाळ काढतो. गालावर मार खाल्यामुळे वधू तरी कशी शांत बसणार, शिवाय ती आजची नारी असल्यानं तीपण भारी निघाली. वधूनेही वराच्या कानशिलात लगावली. त्यानंतर अजून जास्त रागवलेल्या वराने वधूच्या गालावर चापटांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. दोघांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हरने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तो लिहितो- आयुष्य आता सुरू झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही त्यांच्या प्रतिक्रिया देताना थकले नाहीत. कमेंट्समध्येही चाहते हसून हसून लोट-पोट झाले आहेत.