groom busy on laptop during marriage photo viral : कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही पद्धत जगभर सुरू झाली. अल्पावधीत ही व्यवस्था अनेकांच्या अंगवळणी पडली. कोरोना संकट नियंत्रणात येऊ लागल्यावर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करून पुन्हा वर्क फ्रॉम ऑफिस ही परंपरागत व्यवस्था सुरू केली. पण आजही जगातील काही कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम हा पर्याय उपलब्ध आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी या पर्यायाचा वापर करून काम करत आहेत. या अशा वातावरणात वर्क फ्रॉम होम संदर्भात नवनवे मीम्स व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेली मीम्स बघताना हसून हसून पोट दुखू लागते.
सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत बंगाली पद्धतीने लग्नाचे विधी सुरू असल्याचे दिसते. एका बाजूस गुरुजी विधी करत आहेत तर दुसऱ्या बाजूस नवरा मुलगा लॅपटॉपवर काम करण्यात बिझी आहे, असे दिसते. या फोटोवरून सोशल मीडियावर तीन गट पडले आहेत.
Viral Video: बॉडी बिल्डर वधू-वर स्टेजवरच दाखवू लागले ताकद, व्हिडिओ होतोय व्हायरल
एक गट नवरा मुलगा ऑफिसच्या कामाच्या बाबतीत केवढा प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, असे सांगत त्याचे कौतुक करत आहे. तर दुसरा गट हा फोटो म्हणजे वर्क फ्रॉम होमचा अतिरेक आहे, असे सांगत आहे. वर्क फ्रॉम होममुळे खासगी आयुष्यच उरलेले नाही. जवळच्या लोकांसाठी वेळ काढताच येत नाही, अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे.
तिसऱ्या गटाने सोशल मीडियावरूनच व्हायरल फोटोवर जोरदार टीका केली आहे. तसेच लग्नाच्या विधींची चेष्टा करणाऱ्या नवऱ्या मुलाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्रामवर ig_calcutta या अकाउंटवरून फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. फोटोवरून उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे.