Viral Video : भर पुरात निघाली वरात! नवरदेवाचा उत्साह शिगेला, गुडघाभर पाण्यातून निघाले वऱ्हाडी

लग्न झाल्यावर वरात काढण्याचा उत्साह प्रत्येकाला असतो. मात्र एका नवरदेवाने त्यासाठी चक्क पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

Viral Video
भर पुरात निघाली वरात  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नवरदेवाला वरात काढण्याचा उत्साह
  • पुराच्या पाण्यातून गेला चालत
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video : लग्नाचा सिझन (Marriage Season) सुरू झाला की त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशळ मीडियावर अपलोड व्हायला सुरुवात होते. प्रत्येक भागातील लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि पद्धती त्यामुळे पाहता येतात. त्यातील काही व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात तर काही व्हिडिओ मजेशीर असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक भागात जोरदार पावसामुळे पाणी साचलं आहे. नदीकिनारी असलेल्या अनेक भागांना धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गाचा फटकाही बसतो आहे. तर काही डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्येही पाऊस पडून गेल्यानंतर पूरस्थिती निर्माण होत आहे. अशाच एका गावातील हा व्हिडिओ आहे. 

नवरदेवाचा उत्साह

या व्हिडिओत नवरदेवाचा कमालीचा उत्साह दिसून येत आहे. लग्न झाल्यानंतर आपली वरात निघण्यासाठी नवरदेव प्रचंड उत्साहात आहे. आपल्या नव्या नवरीला घेऊन वरातीसाठी तो नटूनथटून सज्ज झाला आहे. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. घरातून बाहेर पडून तो वरातीसाठी आपल्या नवरीला घेऊन चालला आहे. मात्र समोरून गुडघाभर खोल पाणी वाहत आहे. त्या पाण्यात उतरावं की नको, असा प्रश्न त्याला पडतो. मात्र क्षणभरातच तो ठरवतो आणि आपल्या नवरीला घेऊन पाण्यात उतरतो. 

अधिक वाचा - Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव

कपडे सांभाळत उतरला पाण्यात

समोरून वाहणाऱ्या पाण्यात हा नवरदेव आणि त्याची नववधू उतरतात आणि रस्त्याचा अंदाज घेत चालू लागतात. त्यांच्यामागे काही वऱ्हाडी मंडळी उभी असल्याचं दिसतं. आता स्वतः नवरदेवच उत्साहात आहे आणि तोच चिखलाच्या पाण्यात उतरला म्हटल्यावर इतरांचाही नाईलाज होतो आणि त्यांनाही पुढच्या काही मिनिटांत अशाच प्रकारे पाण्यात उतरून वरातीसाठी जावं लागणार असल्याचं स्पष्ट होतं. नवरदेव आणि नववधू आपले लग्नाचे नवेकोरे कपडे सांभाळत या पाण्यातून वाट काढतात आणि वरातीसाठी रवाना होतात.

अधिक वाचा - झारखंड : बारा वर्षांच्या सरफराजने सांगितली शाळेची धक्कादायक सत्यकथा

व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नवरदेवाचा उत्साह पाहून युजर्स खूश झाले आहेत. भर पावसातही वरात काढण्याच्या त्याच्या उत्साहाला प्रत्येकजण दाद देत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखापेक्षाही अधिक व्ह्यूज आले आहेत. त्यावर काहीजणांच्या मजेशीर कमेंट्ही येत आहेत. भावा, लग्नाची तारीख जरा पुढे ढककली असतीस, तर काय बिघडलं असतं, असा सवाल एकाने केला आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की हा तर सात समुद्र पार करून जाणारा राजपुत्रच निघाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी