[VIDEO] महिलेने नवरदेवाला लग्नात चक्क खरीखुरी AK-47 दिली भेट!

आतापर्यंत बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु आम्ही आपल्याला एक व्हिडिओ दाखविणार आहोत जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

AK_47_Weeding
[VIDEO] महिलेने नवरदेवाला लग्नात चक्क खरीखुरी AK-47 दिली भेट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • एका लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे व्हायरल 
  • व्हिडिओमध्ये एक महिला वराला चक्क एके 47 रिव्हॉल्व्हर भेट देत आहे
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक विविध प्रकारे यावर  देत आहेत

नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण यावेळी जो व्हिडिओ समोर आला आहे तो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ एका विवाह सोहळ्याचा आहे जिथे लग्नसोहळ्या दरम्यान नवरदेवाला भेटवस्तू म्हणून एखादं गिफ्ट किंवा प्रेझेंट पॉकेट देण्यात आलेलं नाही तर त्याला चक्क अत्याधुनिक कलाश्निकोव AK-47 रायफल देण्यात आली आहे. ती देखील एका महिलेने ही रायफल नवरदेवाला भेट दिली आहे. ज्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकं वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. 

असॉल्ट रायफल नवरदेवाला दिली भेट 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये सासू आपल्या जावयाला भेटवस्तू म्हणून रशियन बनावटीची AK-47 रायफल कलाश्निकोव्ह भेट देत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला महिलेने स्टेजवर बसलेल्या नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आणि मग समोर उभे असलेल्या व्यक्तीकडून असॉल्ट रायफल मागून तिने ती नवरदेवाला भेट म्हणून दिली. यावेळी, तेथे उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या देखील वाजवल्या. 

हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कोणत्या शहराचा आणि कधीचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करुन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आमिर खान नावाच्या व्यक्तीने लिहिले, 'लज्जास्पद, हे पाकिस्तानमधील बनावट धार्मिक लोक विवाहात शस्त्रे देतात, शाळेवर बॉम्बस्फोट करतात, मशिदींना आग लावतात आणि संपूर्ण जगाला इस्लामचे ज्ञान देतात.' दरम्यान, याच व्हिडिओवर भाष्य करताना दुसर्‍या व्यक्तीने लिहिले की, 'मी यापूर्वी कधीही यासारखी भेटवस्तू कधी पाहिली नव्हती आणि कधीच तसे ऐकले देखील नव्हते.' 

दरम्यान, या व्हिडिओमुळे पाकिस्तानमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे. पण अद्याप तरी हा व्हिडओ नेमका कोणता आहे हे समजू शकलेलं नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी