खात्यात आले 11 हजार 677 कोटी आणि निघून गेले पण जाण्याआधी खातेदाराचा पाच लाखांचा फायदा करून गेले

Gujarat 11677 crore deposit in account by mistake person earned 5 lakhs before the money was lost : गुजरातच्या अहमदाबादमधील रमेश सगर ऑनलाइन ट्रेडिंग करतात. त्यांच्या खात्यात सकाळच्या सुमारास एकदम 11 हजार 677 कोटी रुपये आले. ही रक्कम जशी अचानक आली तशीच काही वेळाने अचानक निघून गेली. पण

Gujarat 11677 crore deposit in account by mistake person earned 5 lakhs before the money was lost
खात्यात आले 11 हजार 677 कोटी आणि निघून गेले पण जाण्याआधी खातेदाराचा पाच लाखांचा फायदा करून गेले  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • खात्यात आले 11 हजार 677 कोटी आणि निघून गेले
  • पैसे जाण्याआधी खातेदाराचा पाच लाखांचा फायदा करून गेले
  • खात्यात आलेल्या पैशांच्या जोरावर रमेश सगर यांनी स्वतःचा पाच लाख रुपयांचा फायदा करून घेतला

Gujarat 11677 crore deposit in account by mistake person earned 5 lakhs before the money was lost : गुजरातच्या अहमदाबादमधील रमेश सगर ऑनलाइन ट्रेडिंग करतात. शेअर बाजारात दररोज खरेदी-विक्रीचे व्यवहार करून नफा कमावतात. त्यांच्या खात्यात सकाळच्या सुमारास एकदम 11 हजार 677 कोटी रुपये आले. ही रक्कम जशी अचानक आली तशीच काही वेळाने अचानक निघून गेली. पण या दरम्यान खात्यात आलेल्या पैशांच्या जोरावर रमेश सगर यांनी स्वतःचा पाच लाख रुपयांचा फायदा करून घेतला. 

रमेश सगर डीमॅट खात्याच्या माध्यमातून दररोज शेअर बाजारात व्यवहार करतात. नेहमीप्रमाणेच ट्रेडिंगसाठी रमेश सगर वेगवेगळ्या शेअरच्या स्थितीचा आढावा घेत होते. थोड्या वेळानंतर त्यांनी व्यवहार सुरू करण्याआधी एकदा तपासून बघावे या उद्देशाने डीमॅट खात्याचा बॅलन्स तपासला. त्यांच्या डीमॅट खात्यात 11 हजार 677 कोटी रुपये जमा झाले होते. ही रक्कम चुकून आली आहे आणि ज्याच्या चुकीमुळे आली आहे ती व्यक्ती रिव्हर्स एन्ट्री करून पैसे परत काढून घेणार हे त्यांनी ओळखले होते. 

गुजरातचे ११ लोकप्रिय पदार्थ

बॉलिवूडच्या ग्लॅमरस बहिणींची गोष्ट

पैसे आहेत तोपर्यंत त्यांचा व्यवस्थित वापर केला तर काय हरकत आहे असा विचार रमेश सगर यांनी केला. खात्यात आलेल्या पैशांपैकी जवळपास दोन कोटी रुपये त्यांनी शेअरमध्ये गुंतवले. थोड्याच वेळात हे शेअर त्यांनी विकले आणि 5 लाख 64 हजार रुपयांचा नफा कमावला. 

भारतात राहणाऱ्या प्रत्येकाकडे असलीच पाहिजे ही IMP डॉक्युमेंट्स

YouTube Video करून पैसे कमावण्याचे आठ सोपे मार्ग

शेअर बाजारातला व्यवहार पूर्ण होत असतानाच खात्यात चुकून आलेली रक्कम जशी आली तशीच निघून गेली. खात्यात एकदम 11 हजार 677 कोटी रुपये आले आणि तसेच एकदम निघून गेले. पण शेअर बाजारातील व्यवहारातून कमावलेला 5 लाख 64 हजार रुपयांचा नफा खात्यात तसाच राहिला. यामुळे रमेश सगर यांचे नुकसान झाले नाही. 

खात्यात चुकून आलेले पैसे कोणाचे होते आणि जेव्हा परत गेले तेव्हा नेमके कुठे हे रमेश सगर यांनी अद्याप बघितलेले नाही. पण त्यांच्या खात्यातील त्यांचे स्वतःचे पैसे तसेच शेअर बाजातील व्यवहारांतून त्यांना झालेला फायदा मिळून झालेली रक्कम त्यांच्या डीमॅट खात्यात सुरक्षित आहे. या पैशांच्या बाबतीत कोणतीही गडबड झालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी