गुजरातमध्ये पार पडली पादण्याची स्पर्धा, स्पर्धेत घडलं असं काही...

व्हायरल झालं जी
Updated Sep 25, 2019 | 13:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Fart Competition: गुजरातमधील सुरतमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा होती पादण्याची. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला सर्वाधिक वेळ, सर्वात धमाकेदार आणि मधूर पादायचं होतं.

gujarat fart competition surat trending viral news
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • गुजरातमध्ये पार पडली अनोखी स्पर्धा
  • सुरतमध्ये आयोजित केली होती पादण्याची स्पर्धा
  • स्पर्धेपूर्वी काही स्पर्धकांनी घेतली माघार
  • कुठल्याही स्पर्धकाला मिळाली नाही ट्रॉफी

अहमदाबाद: आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या स्पर्धा पाहिल्या असतील पण गुजरातमधील सुरतमध्ये एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा होती पादण्याची. सुरतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पादण्याच्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला सर्वाधिक वेळ, सर्वात धमाकेदार पादायचं होतं आणि तोच व्यक्ती या स्पर्धेचा विजयी ठरणार होता. भारतात पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेतील पुरस्कार वितरण तीन श्रेणीत करण्यात आलं होतं. या तीन श्रेणींमधील पुरस्काराचं नाव 'सर्वाधिक वेळ पादणे ट्रॉफी', 'सर्वात धमाकेदार पादणे ट्रॉफी' आणि 'मधूर पादणे ट्रॉफी' असं ठेवण्यात आलं होतं.

... आणि काही पादऱ्या स्पर्धकांनी घेतली माघार

पादण्याच्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या काही स्पर्धकांना ऐनवेळी लाच वाटली आणि त्यांनी माघार घेतली. त्यामुळे या स्पर्धेत अवघे तीनच स्पर्धेक उरले आणि या तिघांपैकी कुठल्याही स्पर्धकाला खास कामगिरी करुन दाखवता आली नाही. स्पर्धेत विजयी होण्यासाठी ठरवण्यात आलेल्या निकषांप्रमाणे कुठल्याच स्पर्धकाला कामगिरी करता न आल्याने ट्रॉफी कुणालाच मिळाली नाही.

देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या पादण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या तिन्ही स्पर्धक पादण्यासाठी मैदानात उतरले मात्र, त्यांची सुद्धा हवा निघाली. यामुळे या स्पर्धेत कुणीही विजयी झाला नाही. इतर स्पर्धकांना लाज वाटल्याने त्यांनी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

६० स्पर्धकांचा सहभाग

ही पादण्याची अनोखी स्पर्धा यतिन संगोई यांनी आयोजित केली होती. यतिन संगोई यांनी म्हटलं की, एका बॅक्वेट हॉलमध्ये आयोजित या स्पर्धेत ६० जणांनी सहभागी होण्यास नोंदणी केली होती. रविवारी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं मात्र, स्पर्धेच्या वेळी केवळ २० स्पर्धकच उपस्थित राहिले. त्यापैकी १७ स्पर्धकांनी लाजेमुळे माघार घेतली आणि केवळ तीनच स्पर्धेकांनी सहभाग घेतला.

पाद मोजण्यासाठी खास उपकरण

ही स्पर्धा पाहण्यासाठी ७० जणांसोबतच काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या स्पर्धेत चांगली कामगिरी न केल्यामुळे कुठल्याही स्पर्धकाला ट्रॉफी मिळाली नाही मात्र, या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आलं. स्पर्धेचे आयोजक यतिन यांनी म्हटलं, स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक स्टेजवर जाण्यास तयार नव्हते कारण त्यांना लाज वाटत होती आणि समोर उपस्थित असलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, कॅमेरे यामुळे लाजत होते. पादण्याची क्षमता मोजण्यासाठी एक खास उपकरण बनवण्यासाठी एका कंपनीसोबत संपर्क सुद्धा केला होता.

पादण्याची स्पर्धा मुंबईत

ही स्पर्धा अपयशी ठरल्यानंतर यतिन संगोई यांनी म्हटलं की, आमचा पुढील प्लान अशा प्रकारची स्पर्धा मुंबईत आयोजित करण्याचा आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांना वेगवेगळ्या केबीन उपलब्ध करुन देण्यात येतील ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या नजरेपासून दूर राहतील. सुरतमध्ये आयोजित स्पर्धेत सुशील जैन, अल्केश पंड्या आणि विष्णू हेदा या तीन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...