नवरीशिवाय 'या' मुलाने केलं लग्न, पाहा काय आहे हा प्रकार...

व्हायरल झालं जी
Updated May 13, 2019 | 22:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

गुजरातमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे लग्न लावले. हे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे ते त्याच्या वेगळेपणामुळे, या लग्नात बँड-बाजा, वाजंत्री तर होती पण नवरी गायब होती.

unique wedding in gujarat, groom married without bride
नवरीशिवाय 'या' मुलाने केलं लग्न  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: आई वडील आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा, हट्ट पूर्ण करण्याचा शक्य तो प्रयत्न करत असतात. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहण्यातच आई-वडिलांना आनंद मिळतो. गुजरातमध्ये एका पित्याने आपल्या २७ वर्षीय मुलाची अशाच प्रकारे एक इच्छा पुर्ण केली आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक विवाह सोहळ्यात सहभागी झाला असाल. पण कधी अशा लग्नात सहभागी झालात का, ज्या लग्नात चक्क नवरीच गायब आहे. विश्वास नाही बसत नाहीये ना? पण असेच एक लग्न नुकतेच पार पडले आहे. गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची इच्छा पुर्ण करण्यासाठी अशी हिम्मत दाखवली आहे.

अजय बरौत लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले, पण त्याच्या वडिलांनी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करत आईचं प्रेम दिलं. अजयची अशीच एक इच्छा होती ती म्हणजे लग्नाची...  मात्र, त्याला मानसिक आजार असल्याने अजचं लग्न करणं त्याच्या वडिलांसाठी शक्य होत नव्हते. पण अजयच्या वडीलांनी त्याची ही इच्छा देखील पूर्ण केली तेही पारंपारिक पद्धतीने. लग्नात बँड-बाजा आणि २०० वराती सहभागी झाले होते पण या लग्नात नवरीच नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे हे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं आहे.
अजयच्या परिवारातील सदस्यांनी त्याच्यासाठी नवरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याच्या लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती. अखेर अजयच्या परिवाराने आपल्या मुलाचं लग्न पारंपारिक पद्धतीने करण्याचा निश्चय केला.

लग्नात मेहंदीची परंपरा पार पडली, तसेच परिवारातील जवळच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. त्यानंतर अजयचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नात अजयने गोल्डन शेरवानी सोबत गुलाबी रंगाचा सेहरा परीधान केला होता. या लग्नात जवळपास २०० नागरिकांनी उपस्थिती लावली. नाचत गात चाललेल्या वरातीत अजयने सुद्धा डान्स केला.

अजयचे वडील विष्णू यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, माझ्या मुलाला मानसिक आजार आहे मात्र, तो लग्नाच्या वातावरणात खूपच आनंदी राहतो. आम्ही त्याचं लग्न करण्याचं ठरवलं, ज्यामुळे तो आनंदी राहील. त्याच्या लग्नाची इच्छा पूर्ण झाल्याने मी खूपच आनंदी आहे.

अजयचे काका कमलेश बरौत म्हणाले, 'माझा पुतण्या नाच गाण्याचा शौकीन आहे, तो कोणतेही लग्न चुकवत नाही. आम्ही सर्वांनी त्याचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. अजय खूष रहावा हा आमचा एकच उद्देश या मागे आहे.'

अजयच्या बहीणीने सांगितले की, माझा भाऊ खूप लकी आहे की पूर्ण परिवाराने मिळुन त्याची ही इच्छा पूर्ण केली. आम्ही सर्वजण खूपच आनंदी आहोत आणि आम्ही कोणाला दुःखी करु इच्छीत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
नवरीशिवाय 'या' मुलाने केलं लग्न, पाहा काय आहे हा प्रकार... Description: गुजरातमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे लग्न लावले. हे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे ते त्याच्या वेगळेपणामुळे, या लग्नात बँड-बाजा, वाजंत्री तर होती पण नवरी गायब होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola