फ्रेंच किस करताना का तोडली पत्नीची जीभ?  पतीने दिले विचित्र उत्तर 

व्हायरल झालं जी
Updated Oct 15, 2019 | 17:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

अहमदाबादच्या जुहापुरामध्य ४६ वर्षीय अयूब मन्सुरी यांच्यावर आपल्या पत्नीची जीभ तोडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की अयूबवर पहिल्या पत्नील जाळून मारल्याचाही आरोप आहे. 

gujarat man cuts wife s tongue tells cops that it got stuck during passionate kissing viral news in marathi google batmya
फ्रेंच किस करताना का तोडली पत्नीची जीभ? पतीचे विचित्र उत्तर 

थोडं पण कामाचं

  • अहमदाबादच्या ४६ वर्षीय अयूब मन्सुरीवर आपल्या पत्नीची जीभ तोडल्याचा आरोप 
  • पोलिसांनी केली अयूबला अटक, साबरमती जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे आरोपी अयूबला
  • अयूबने सांगितले, किस करताना जीभ चिकटली होती पती-पत्नीची जीभ 
  • पोलिसांना या दाव्यावर विश्वास नाही, सर्जरीनंतर आता लिक्वीड डायटवर आहे पीडित पत्नी 

अहमदाबाद :  फ्रेंच किस करताना आपल्या पत्नीची जीभ तोडल्याचा आरोप असलेल्या आरोपी व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याने आपली चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य करताना एक विचित्र तर्क दिला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, ९ ऑक्टोबरला आपल्या पत्नीला कीस करताना त्याची आणि पत्नीची जीभ एक-दुसऱ्याला चिकटली होती. त्यामुळे नाईलाजास्तव जीभ कापावी लागली. अहमदाबादच्या जुहापुरा भागात राहणाऱ्या ४६ वर्षीय अयूब मन्सूरी याच्यावर आपल्या पत्नीची जीभ तोडल्याचा आरोप आहे. 

वेजलपूर पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की अशी शक्यता आहे की चौकशीवेळी मन्सुरी पोलीसांना अंधारात ठेवत आहे. एका पोलिसाने सांगितले की, अयूबने सांगितले की एकमेकांच्या जवळ आल्यावर उत्तेजनेनंतर त्याने पाहिले की पत्नीची जीभ त्याच्या जीभेला चिकटली आहे. या दरम्यान, दोघांनी जीभ वेगळी करण्याच प्रयत्न केला, पण याच दरम्यान पत्नीची जीभ तुटली. 

पीडित पत्नी आता बोलू शकत नाही.... 

मन्सुरीने पोलिसांना पुढे सांगितले की त्याला जेव्हा समजले तेव्हा त्याचा पत्नीची जीभ तुटली होती आणि खूप रक्त वाहत होते. मी घाबरलो. त्याने पोलिसांनी सांगितले, पत्नीला घरात बंद करून मी घटनास्थळावरून फरार झालो. दुसरीकडे पीडित तसलीम आता बोलू शकत नाही. त्यांना खाण्यातही प्रॉब्लेम आहे. ९ ऑक्टोबरच्या रात्री सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

अयूबची तिसरी पत्नी आहे तसलीम 

तसलीमचा दीर इदरीस मन्सुरी याने सांगितले की सर्जरीनंतर ती लिक्विड डायटवर आहे. तसलीम आरोपी अयूब मन्सुरीची तिसरी पत्नी आहे. तर अयूब हा तसलीमचा दुसरा पती आहे. मार्च २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले होते, त्यानंतर अयूब तसलीम हीला नेहमी मारहाण करत होता. पोलिसांनी सांगितले की अयूबवर पहिल्या पत्नी परवीनला जिवंत जाळून मारण्याता आरोप आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी