Viral News In Marathi | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावे आणि शहरे स्वच्छ करण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले होते. 'स्वच्छ भारत' असे महात्मा गांधीजींच्या चष्म्याच्या वेगवेगळ्या लेन्समध्ये लिहिलेले 'एक पाऊल स्वच्छतेकडे' हे वाक्य देशातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचले आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील अस्वच्छतेचा सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहताच क्षणी लोक अद्यापही स्वच्छतेला प्राधान्य देत नसल्याचे दिसते आहे. हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विट केला आहे, ज्यावर लोक खूप मीम्स देखील बनवत आहेत. (Gutkha spit stain on aircraft window, ridicule with sharing photos by IAS officers).
अधिक वाचा : 'या' दिवशी जाहीर महाराष्ट्राचा बारावीचा निकाल
दरम्यान, आयएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर विमानातील खिडकीच्या सीटचा फोटो शेअर केला आहे. पण हा फोटो सामान्य नव्हता. यामध्ये खिडकीच्या खालीच गुटख्याचा मोठा साठा दिसतो. फोटो शेअर करताना शरण यांनी फोटोवरून खिल्ली उडवली, "कोणीतरी इथे आपली ओळख सोडून दिली आहे." अशी त्यांना हास्यास्पद टिप्पणी केली आहे.
अधिक वाचा : देशातील ही हिल्स स्टेशन्स स्वच्छतेच्या बाबतीत टॉपवर
हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यावर नेटकरी विविध हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. मात्र काही युजर्संनी यासाठी चित्रपटातील अभिनेत्यांना जबाबदार धरले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, तंबाखूजन्य पदार्थांचे अधिक सेवन करण्यासाठी सुपरस्टार्सचे समर्थन आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण ट्विटरवर खूप सक्रिय असतात. यापूर्वी आयएएस अधिकाऱ्यांनी कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये संपूर्ण खांब तंबाखू आणि सुपारीच्या पानांनी भरलेला दिसत होता. अवनीश शरण यांनी या ट्विटसह शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले होते.