Happy Valentine Day 2021: व्हॅलेंटाईन डे निमित्त Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Happy Valentine Day 2021 wishes messages, images, whatsapp status: १४ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपलं प्रेम व्यक्त केलं जातं.

Happy Valentine Day 2021
Happy Valentine Day 2021 

Happy Valentine Day 2021 messages: १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक (Valentine week)धील शेवटचा दिवस असतो आणि त्याला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणतात. या दिवसाची प्रेमी जोडपे मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपल्या जोडीदारासमोर प्रेम व्यक्त करतात. तसेच त्यांना गिफ्टही देतात. आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खूपच खास असतो.

यंदा कोरोनाच्या सावटामुळे तरुण-तरुणी एकमेकांना भेटण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र, असं असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डे निमित्त शुभेच्छा (Valentine Day wishes messages) देणारे मेसेज पाठवू शकतात. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही शुभेच्छा देणारे मेसेजेच ज्याद्वारे तुम्ही आपल्या प्रियजनांना हे मेसेज पाठवून शुभेच्छा देऊ शकतात.

पाहूयात सोशल मीडिया व्हायरल होणारे काही मेसेजेस

पहिलं प्रेम म्हणजे भाळणं आणि 

खरं प्रेम म्हणजे सांभाळणं 

भाळणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या 

साऱ्याचं प्रेमळ जीवांना 

व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा

प्रेमाला भाषा नसते,

प्रेमाला धर्म नसतो 

प्रेमाला कळते फक्त नजरेची भाषा 

व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा

प्रेम व्यक्त करण्याचा दिवस अर्थात व्हॅलेंटाईन डे! 

जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस

अशा दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
 

प्रेम म्हणजे कुणीतरी आपलंसं वाटणं...

प्रेम म्हणजे अनेक जन्मांची ओळख पटणं...

'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

प्रेमाने जग जिंकता येते 

विश्वासाने नाती 

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा

तुझ्या प्रेमाचा रंग अजूनही बहरत आहे 

शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच आहे 

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा 

प्रेम कोणी करत नाही होऊन जातं

अगदी स्वत:च्याही नकळत मन दुसऱ्याचं होऊन जातं 

व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा 

तुझं माझं नातं असं असावं 

जे शब्दांच्या पलिकडे उमगावं 

हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी