heart of a blue whale: blue whaleचं हृदय पाहून मुंबईतील घर वाटेल छोटं; तीन किलोमीटरपर्यंत ऐकू येते हृदयाची धकधक

heart of a blue whale: कॅनडाच्या (Canada) रॉयल ओंटारियो म्युझियममध्ये (Royal Ontario Museum) ब्लू व्हेलचे हृदय जतन करण्यात आले आहे. या हृदयाचा फोटो हर्ष गोयनका यांनी 13 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, हे एका ब्लू व्हेलचं सुरक्षित हृदय आहे, ज्याचे वजन 181 किलोग्राम आहे.

heart of a blue whale: blue whale big than mumbai's house
ब्लू व्हेलचा हृदय पाहून मुंबईतील घर वाटेल छोटं   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर ब्लू व्हेलच्या हृदयाचा एक फोटो शेअर केला आहे.
  • या हृदयाचा फोटो हर्ष गोयनका यांनी 13 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केला आहे.
  • आतापर्यंत या ट्वीटला दोन हजारांहून अधिक लाईक्स आणि 1 लाख 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

heart of a blue whale:मुंबई : ब्लू व्हेल (blue whale)हे जगातील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे या प्राण्याचे हृदयही मोठे असेल हे उघड आहे. व्हेल माशाचा आकार पाहून आपले डोळे विस्फारले जातात. त्याच माशाचे हृदय पाहिल्यानंतर चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. तीस मीटरपर्यंत लांब आणि 200 किलो वजनाच्या या महाकाय माशाचं हृदय (heart) किती मोठं असेल बरं?  असा प्रश्न तुम्हाला मुलांनी विचारला तर, या माशाचे वजन किती असते, किती मोठा असतो व्हेल मासा असा प्रश्न विचारला तर?  (blue whale big than mumbai's houses; heartbeat can be heard up to three kilometers away)

मुलं त्यांच्या जिज्ञासापोटी हा प्रश्न करू शकतात. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर?  तुम्हाला शांत बसावे लागेल, ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही याचं उत्तर देत आहोत. ब्लू व्हेल हा सर्वात मोठा प्राणी आहे, निश्चितीच त्याचे हृदय आकाराने मोठे राहील. ब्लू व्हेलचे हृदय किती मोठं असते याचा आकडा पाहून लोक निश्चित आश्चर्यचकित होतील.  सध्या सोशल मीडियावर ब्लू व्हेलच्या हृदयाचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या महाकाय सागरी प्राण्याच्या हृदयाचा फोटो शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कॅनडाच्या रॉयल ओंटारियो म्युझियममध्ये ब्लू व्हेलचे हृदय जतन करण्यात आले आहे. या हृदयाचा फोटो हर्ष गोयनका यांनी 13 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, हे एका ब्लू व्हेलचं सुरक्षित हृदय आहे, ज्याचे वजन 181 किलोग्राम आहे. हे 1.2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर लांब असून या हृदयाच्या ठोक्याचे आवाज आपण 3.2 किलोमीटरपर्यंत इतक्या लांब अंतरावरुन ऐकू शकतो. 

आतापर्यंत या ट्वीटला दोन हजारांहून अधिक लाईक्स आणि 1 लाख  82  हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले - उत्कृष्ट... वनस्पतीपासून प्राणी आणि मानवांपर्यंत, विश्वाची स्वतःची सर्जनशीलता आहे. मुंगीपासून व्हेलपर्यंत किती सुंदर बनवले आहे. दुसर्‍या युजरने लिहिले - माझ्या मुंबईतील घराचा आकार इतका आहे. यावर तुमचे काय मत आहे? कमेंट करून सांगा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी