Mumbai Rain Memes Viral : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

कालपासून मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. असे असले तरी मुंबईकर पावसात मार्ग काढत आपले काम करत आहेत. चाकरमानी लोकलची वाट पाहत आहेत. शाळांमध्येच पाणी भरल्याने अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

mumbai rainn meme
मुंबई पाऊस मीम्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कालपासून मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे.
  • अनेक भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
  • मुंबईकरांच्या आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणारे मीम्स मात्र सतत हीट असतात.

Mumbai Rain Memes Viiral : मुंबई :  कालपासून मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. अनेक भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. असे असले तरी मुंबईकर पावसात मार्ग काढत आपले काम करत आहेत. चाकरमानी लोकलची वाट पाहत आहेत. शाळांमध्येच पाणी भरल्याने अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय अशी मुलांनी भोलानाथला घातलेली गळ खरी झाली आहे. अशातही मुंबई सुरू आहे. हा नाईलाज आहे की मुंबई स्पिरीट यावर कायमच चर्चा घडत असतात. मात्र मुंबईकरांच्या आयुष्याचं प्रतिबिंब दाखवणारे मीम्स मात्र सतत हीट असतात.

गेले तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. पुढचे पाचेक दिवसही हीच संततधार कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नेटकरी आपलं ऑफलाईन पावसातून रस्त्यांवर मार्ग काढताना ऑनलाईन मीम्सची बरसात करताना दिसत आहेत. स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग मंच 'कू' वर आणि ट्विटरवर अशाच काही चिंबओल्या मीम्सची झलक बघायला मिळते आहे. हे मीम व्हायरल झाले असून अनेकांनी आपल्या मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांना पाठवून मजा घेतली आहे. तसेच हे मीम नेटकर्‍यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून स्टोरीवरही ठेवले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी