Optical Illusion: या फोटोमध्ये लपले आहेत १० नेत्यांचे चेहरे; चालवा बुद्धी आणि ओळखा चेहरे 

व्हायरल झालं जी
Updated May 17, 2022 | 13:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Optical Illusion । ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांना फसवणे अथवा डोळ्यांची परीक्षा घेणे होय. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

Hidden in these photos are the faces of 10 leaders 
या फोटोंमध्ये लपले आहेत १० नेत्यांचे चेहरे, ओळखा पाहू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • सध्या ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो व्हायरल होत आहे.
  • या फोटोमध्ये १० नेत्यांचे चेहरे लपले आहेत.

Optical Illusion । मुंबई : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांना फसवणे अथवा डोळ्यांची परीक्षा घेणे होय. ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) अनेक फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. मनाला भिडणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन्सची चित्रे पाहण्यातही वेगळीच मजा आहे, कारण माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला जे आव्हान आहे ते शोधायचे असते. त्याला शोधणे कठीण जाते. (Hidden in these photos are the faces of 10 leaders). 

अधिक वाचा : गृहिणींनी १५ मिनिटांसाठी घरीच करा हे ५ व्यायाम, वाचा सविस्तर

सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. या एका फोटोत एक झाड लपले आहे, पण या झाडाच्या आत अनेक नेतेमंडळींचे चेहरे दडले आहेत. या फोटोतील नेत्यांचे चेहरे ओळखताना भल्याभल्यांच्या डोक्याचे दही झाले आहे. कारण या फोटोमध्ये आपण पाहता क्षणी केवळ ५ ते ६ चेहरे ओळखू शकतो राहिलेले चेहरे ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीला ताण द्यावा लागेल. 

नेत्यांचे चेहरे या फोटोमध्ये लपले आहेत

Optical illusion 1

दरम्यान, ही एक कलाकृती आहे, तिचे नाव ‘National Leaders Tree' असे आहे. पाहता क्षणी हे फक्त एक झाड असल्याचा भास होतो. मात्र त्या झाडामध्ये १० भारतीय नेत्यांचे चेहरे लपलेले आहेत. त्यामुळे हे चेहरे ओळखण्यासाठी भल्याभल्यांना घाम फुटला आहे. 

नाही मिळाला तर इथे पाहा

Optical illusion 2

या फोटोत ज्या दहा नेत्यांचे चेहरे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, राजीव गांधी, इंदिरा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, जवाहरलाल नेहरू, गोपाळ कृष्ण गोखले, चंद्रशेखर आझाद आणि डॉ. राधाकृष्णन.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी