५१ लाखांना विकली गेली अनोखी म्हैस, दूध देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ऐकून थक्क व्हाल 

जगात सर्वाधिक जास्त दूध देण्याचा विक्रम बनविणारी म्हैस विकली गेली आहे. ही म्हैस हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील लितानी गावातील शेतकरी सुखबीर ढांडा यांची आहे.

hisars buffalo saraswati sold in 51 lakh rupees who made world record to beat pakistan viral news in marathi tvirl 44
५१ लाखांना विकली गेली अनोखी म्हैस, दूध देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ऐकून थक्क व्हाल   |  फोटो सौजन्य: YouTube

लुधियाना : जगात सर्वाधिक जास्त दूध देण्याचा विक्रम बनविणारी म्हैस विकली गेली आहे. ही म्हैस हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील लितानी गावातील शेतकरी सुखबीर ढांडा यांची आहे. मुर्राह जातीची म्हैस सरस्वती पंजाबच्या लुधियानामधील शेतकरी पवित्र सिंग यांनी ५१ लाखांना खरेदी केली आहे. यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी सिंधवा खास या गावाताली शेतकऱ्यांने मुर्राह जातीची म्हैस लक्ष्मी २५ लाखांना विकली होती. जिला गुजरातच्या एका शेतकऱ्याने खरेदी केले होते. 

या म्हशीने काही महिन्यांपूर्वी लुधियाना येथील डेअरी अँड अॅग्रो एक्स्पोतील एका स्पर्धेत ३३.१३ किलो दूध देऊन  विश्व विक्रम केला होता. यावेळी म्हशीच्या मालकाला दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळाले हेतो. लितानी येथील शेतकरी सुखबीर ढाडा यांनी म्हैस विक्री पूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला. यात हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पंजाबमधील शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

सुखबीरचे म्हणणे आहे की त्याला आपली म्हैस विकायची नव्हती. पण आसपासच्या भागात म्हैस चोरण्याची टोळी सक्रीय झाल्याने सरस्वतीची चोरी होऊ शकते या भीतीने हा निर्णय घेतला. यापूर्वी सर्वाधिक दूध देण्याचा विश्व विक्रम पाकिस्तानच्या म्हशीच्या नावावर होता. तीने ३२.०.५० किलो दूध दिले होते. सुखबीर यांनी सांगितले की,  त्याने ही म्हैस एक लाख ३० हजार रुपयांना ही म्हैस चार वर्षांपूर्वी बरवालाच्या खोखा गावातून गोपीराम या शेतकऱ्याकडून विकत घेतली होती. 

सुखबीर यांनी सांगितले की, म्हैस सरस्वती एक पारडू आहे त्याचे नाव नवाब आहे. त्याचे वीर्य विकून ते दर वर्षी लाखो रुपये कमवत आहेत. त्यांच्या सरस्वतीच्या माध्यमातून क्लोन तयार करण्याची तयारी शास्त्रज्ञ करत आहेत. सरस्वतीपासून जन्माला येणाऱ्या पारडूची किंमत चार लाख रुपये आहे. 

त्यांनी सांगितले की सरस्वतीने गेल्या वर्षी २९.३१ किलो दूध देऊन हिस्सारमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. हिस्सारच्या केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या एका स्पर्धेत सर्वाधिक दूध देण्यामध्ये सरस्वती अव्वल ठरली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी