स्मशानात मधमाशांनी केला हल्ला, मृतदेह सोडून पळाले गावकरी 

गुजरातच्या नवापूर तहसीलच्या मोटा कडवण गावात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी तिचा मृतदेह घेऊन अत्यंविधीसाठी स्मशान भूमीत पोहचले. त्याचवेळी जवळच असलेल्या मधमाशांचा पोळा फुटला आणि मधमाशांच्या टोळीने गावकरांवर

Honey bees attack on humans in cremation in gujarat viral news in marathi tvirl 88
स्मशानात मधमाशांनी केला हल्ला, मृतदेह सोडून पळाले गावकरी   |  फोटो सौजन्य: BCCL

नवापूर :  गुजरातच्या नवापूर तहसीलच्या मोटा कडवण गावात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी तिचा मृतदेह घेऊन अत्यंविधीसाठी स्मशान भूमीत पोहचले. त्याचवेळी जवळच असलेल्या मधमाशांचा पोळा फुटला आणि मधमाशांच्या टोळीने गावकरांवर हल्लाबोल केला. एक-एका व्यक्तीवर अनेक मधमाशा तुटून पडल्या. यात १२ गावातील सुमारे १५३ जणांवर या मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी हल्ला केल्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाले. सर्व जण सैरावरा धावू लागले.  उपस्थितांनी मृतदेह सोडून गावाकडे धाव घेतली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मधमाशांच्या हल्ल्यानंतर अनेकांना अॅब्युलन्सने हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  त्यानंतर दुपारी मधमाशांचे रौद्ररूप शांत झाल्यावर जेसीबीच्या मदतीने स्मशान भूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.  एका स्थानिक नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार जखमीमध्ये महाराष्ट्रातील ८ आणि गुजरातमधील चार गावातील नागरिकांचा समावेश आहे. 

महिलेचा झाला होता मृत्यू 

मधमाशांच्या हल्यानंतर जखमींना विसरवाडी, खांडबारा, नवापूर, नंदुरबार आणि चिंचपाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ज्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी हे सर्व नागरिक जमा झाले होते त्या मोटा कडवण गावातील लक्ष्मी बेन सखाराम वळवी या ५९ वर्षांच्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...