या ठिकाणी लग्नाआधीच होत असतो हनिमून; कुटुंबियांची असते सहमती, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

लग्नाआधी  (marriage) शारीरिक संबंध ( Sexual intercourse)ठेवणं याला अनेकजण विरोध करत करतात. तर काही जण याला पाप मानतात. परंतु विदेशात लग्नाआधी शारिरीक संबंध ठेवणं साधारण गोष्ट आहे.

Honeymoon takes place before marriage in this place
या ठिकाणी लग्नाआधीच होत असतो हनिमून, काय आहे हा प्रकार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुरिया आदिवासी हे गोंड जमातीत येतात.
  • या जमातीमध्ये घोटूल नावाची परंपरा आहे.
  • तरुण मुला-मुलींना शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.

नवी दिल्ली :  लग्नाआधी  (marriage) शारीरिक संबंध ( Sexual intercourse)ठेवणं याला अनेकजण विरोध करत करतात. तर काही जण याला पाप मानतात. परंतु विदेशात लग्नाआधी शारिरीक संबंध ठेवणं साधारण गोष्ट आहे. पण आपल्या देशात परंपरा ((tradition) आणि रुढी पाहता या गोष्टीला विरोध मोठ्या प्रमाणात होत असतो.  (Honeymoon takes place before marriage in this place; Families have consensus)

अधिक वाचा  : लग्नाच्या पहिल्या रात्री काय करतात भारतीय जोडपे

कॉस्मोपॉलिटन कल्चरमध्ये राहणाऱ्या तरुण म्हणातात की, लग्नापूर्वी अशा प्रकारचे नातेसंबंध ठेवण्यात कोणतेच गैर नाही. अनेक सर्वेक्षणांमध्ये असे समोर आले आहे की, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणारे अनेक जण होते. पण  कुणासमोर ते आपल्या मनातील ही इच्छा बोलून दाखवत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का आपल्याच देशात एक अशी जागा आहे जिथे तरुणांना लग्नाआधी प्रणय आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे.  परंपरा, रुढी , या गोष्टी असतानाही शारीरिक संबंधाला मान्यता दिली जाते. हे कुठे होते, कोणत्या समाजात हे होतं याविषयी माहिती घेणार आहोत... 

अधिक वाचा  संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स

हे ठिकाण आहे छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील बस्तर या जिल्हा. या जिल्ह्यातील मुरिया आदिवासी हे गोंड जमातीत येतात. त्यांच्या चालीरीती आणि पंरपरा अगदी वेगळ्या आहेत. या चालीरिती वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या देशात शारीरिक संबंधांबद्दल सार्वजनिकपणे बोलणे ही मोठी चूक मानली जाते. पण या आदिवासी जमातींमध्ये हे सामान्य आहे. येथे तरुण मुला-मुलींना शारीरिक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. एवढेच नाही तर त्याला प्रोत्साहनही दिले जाते. 

आपल्या आवडीने मुलगी आपला साथीदार निवडते

या जमातीमध्ये घोटूल नावाची परंपरा आहे. घोटूल याचा अर्थ बांबूपासून बनवलेला एक रुम हे शहरातील नाईट क्लबसारखे असते. येथे मुरिया जातीचे मुलं नृत्य शिकतात, गाणे गातात. येथे मुलं-मुली मज्जा करण्यासाठी आणि मस्ती करण्यासाठी येत असतात. 10 वर्ष ज्या मुलाने पूर्ण केले असतील तो मुलगा तेथे जाण्यास पात्र असतो. जर तो जात नसेल तर आई-वडील त्याला जबरदस्तीने तेथे पाठवत असतात. 

अधिक वाचा  : मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार

येथे आलेल्या मुली प्रत्येक रात्री आपला साथीदार निवडत असते. त्याच्यासोबत प्रणय करते. तिच्यावर कोणाचा दबाव नसतो. ती आपल्या मर्जीने  साथीदार निवडत असते.  तो तिच्या व्यक्ती स्वांतत्र्याचा भाग असतो. दरम्यान मुलासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा होऊ नये म्हणून मुली नैसर्गिक गर्भनिरोधक औषध पीत असतात. तरीही  बाळ झालं आणि त्या मुलाचा बाप कोण हे जेव्हा माहिती होतं तेव्हा पूर्ण गाव  त्या मुलाला स्वीकारत असतं. 

कंगव्याद्वारे जोडीदाराची ओळख

पार्टनर म्हणजेच आपल्या जोडीदाराला निवडण्याची एक वेगळीच पद्धत असते. घोटूल येथे आलेल्या मुलं आपल्या आवडीच्या मुलीला बांबूचे कंगवे देतात. ही कंगवे मुलांना त्यांच्या डोक्यावर लावावी लागतात. जर मुलींना हे आवडलं तर त्या त्याला आपल्याकडे ठेवून घेतात. आवडला नाही तर कंगवा हटवला जातो. 

केसात कंगवा असणे म्हणजे मुलीला तो मुलगा आवडतो. त्यानंतर ते दोघं एकत्र राहू शकतात आणि त्यांना हवे ते करू शकतात. काही महिन्यांनी हे दोघे एकमेकांना आवडले तर दोन्ही घरातील वडीलधारी मंडळी त्यांचे लग्न लावून देतात. असे बरेच लोक आहेत ज्यांनी गरोदरपणात लग्न केले. घोटूल प्रौढ शिक्षण देते. तसेच शारीरिक संबंधाविषयी असलेले गैरसमजही दूर करते. या परंपरेविषयी येथील स्थानिक म्हणतात की,  या परंपरेमुळे आदिवासी भागात लैंगिक छळ होत नाही. आजपर्यंत येथे असा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी