Viral Video: भयंकर... 6300 फूट उंचीवर झोका घेणाऱ्या मुली थेट गेल्या डोंगराखाली!

Shocking Accident Video: काही लोक अशा साहसी गोष्टी करतात जे पाहून आपलाही थरकाप होतो. असंच काहीसं करताना दोन मुली अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आल्या आहेत.

horrible accident girls swinging at a height of 6300 feet felt a jolt and went under mountain
Viral Video: भयंकर... 6300 फूट उंचीवर झोका घेणाऱ्या मुली थेट गेल्या डोंगराखाली! 
थोडं पण कामाचं
  • या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • दरीच्या किनाऱ्यावर झोका घेत होत्या मुली
  • ६३०० फूट उंचीवर बसवण्यात आला होता झोका

Shocking Accident Video: तरुण-तरुणींना साहसी खेळ नेहमीच आवडतात. काही लोकांना खतरनाक साहसी खेळ (Adventure game) खूपच आवडतात. तुम्ही पाहिलं असेल की अनेकांना डोंगर, (mountain) दऱ्यांची जरा जास्त आवड असते किंवा त्याबाबत प्रेम असतं. त्यासाठी ते डोंगरावर जातात आणि तिथल्या विविध साहसी खेळात भाग घेतो. पण काही लोक अशा साहसी गोष्टी करतात, की जे पाहून आपल्या जीवाचा मात्र थरकाप उडतो. (horrible accident girls swinging at a height of 6300 feet felt a jolt and went under mountain)

झोका घेताना भीषण अपघात

जर तुम्हालाही अशा स्टंट्समध्ये रस असेल, तर तुम्ही पुरेसे प्रशिक्षण आणि सुरक्षितता निकष लक्षात घेऊन खेळ खेळले पाहिजे. जर तुम्ही सुरक्षेचे निकष लक्षात न ठेवता असे वेडे साहस केले तर  व्हिडिओत ज्या प्रमाणे मुलींसोबत घटना घडली तशीच तुमच्यासोबतही घडू शकते. आता तुम्हीच बघा त्या दोन मुली जेव्हा सुरक्षेचे निकष लक्षात न ठेवता झोका घेत पण त्यांच्यासोबत जे काही घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

अधिक वाचा: Revenge of Boyfriend : धोकेबाज बॉयफ्रेंडचा तिने घेतला बदला, पेपरात दिली अशी जाहीरात

झोक्यावर बसण्याचा शौक हा सगळ्यांनाच असतो. जर एखाद्या साहसी ठिकाणी झोका लावला असेल तर तिथे झोका घेण्याची मजा ही काही तरी  वेगळीच असते. आपण पाहू शकता की हा झोका डोंगराच्या अगदी काठावर बसविण्यात आला होता. या ठिकाणाची उंची समुद्र सपाटीपासून ६३०० फूट होती. दोन मुली एका मोठ्या झोक्यावर बसून झोका घेत होता. तर एक व्यक्ती त्यांना पाठीमागून झोका देत असल्याचं पाहायला मिळत आहेत. पण मागून झोका देत असताना त्या व्यक्तीकडून एक चूक होते.

अधिक वाचा: Shocking Story : लग्नापूर्वीच होणाऱ्या वधूने वराला गंडवलं, एअरपोर्टवरून सर्व सामानसह 4.8 लाख घेऊन झाली फरार

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, झोक्याला अचानक धक्का बसतो, ज्यामुळे झोका स्वैरपणे फिरतो. ज्यामुळे झोक्यात बसलेल्या मुली झोक्यातून सरकतात आणि थेट डोंगरावरून दरीत कोसळतात. ही घटना कॅस्पियन समुद्राच्या पश्चिमेला असलेल्या रशियन रिपब्लिक ऑफ डॅगेस्टनची आहे. 

सुदैवाने दोन्ही मुलींचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्यांचे प्राण वाचले. कारण डोंगरावरुन खाली कोसळल्यानंतर मुली काही फूट खाली लाकडी प्लॅटफॉर्मवर पडल्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. @ShockingClip नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी