दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत १७०० रुपये; बिल झाले व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Aug 12, 2019 | 11:42 IST | Times Now

ट्विटरवर एका महागड्या हॉटेलचे बिल व्हायरल झाले आहे. बिलामध्ये एका ऑम्लेटचा दर ८५० रुपये तर, दोन उडकलेल्या अंड्यांचे बिल १७०० रुपये लावण्यात आले आहे. त्यावरून आता ट्विटरवर त्या हॉटेलला टार्गेट केलंय जातंय.

boiled eggs viral hotel bill
उकडलेल्या अंड्यांचे बिल झाले व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महागड्या हॉटेलचा आणखी एक बिल सोशल मीडियावर झाले व्हायरल
  • दोन उकडलेली अंडी फक्त १ हजार ७०० रुपयांना
  • ट्विटरवर यूजर्सने उडवली हॉटेलची खिल्ली; कारवाईची अपेक्षा
  • राहुल बोसच्या दोन केळीनंतर आता दोन उकडलेली अंडी झाली व्हायरल

मुंबई : अभिनेता राहुल बोसनं काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलचं बिल सोशल मीडियावर शेअर केलं होतं. दोन केळी आणि त्याचे लावलेले अवास्तव बिल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. आता असेच आणखी एक बिल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. ट्विटरवर या बिलाचे फोटो शेअर झाल्यानंतर यूजर्सनी त्या हॉटेलची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. त्या बिलामध्ये एका ऑम्लेटचा दर ८५० रुपये तर, दोन उडकलेल्या अंड्यांचे बिल १७०० रुपये लावण्यात आले आहे. त्यावरून ट्विटरवर त्या हॉटेलला टार्गेट केलंय जातंय. कोणी म्हटलंय ते सोन्याचं अंड आहे तर कोणी त्या अंड्याची तुलना डायनासोरच्या अंड्याशी केलीय. राहुल बोसनं शेअर केलेल्या हॉटेलला त्या प्रकरणात माफी मागावी लागली होती. तसेच त्यांना दंडही भरावा लागला होता. आता मुंबईतील या हॉटेलवरही तशीच कारवाई होणार का? याची उत्सुकता लागलीय.

 

 

सोन्याचं अंड देणारी कोंबडी?

आपल्याला सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आठवत असेल, त्या गोष्टीतील कोंबडी जणू प्रत्यक्षात अवतरल्याचा अनुभव मुंबईतील एका हॉटेलमध्ये आला आहे. कारण, दोन उकडलेल्या अंड्यांचं बिल १७०० रुपये लावल्याचा प्रकार एका मुंबईतील हॉटेलमध्ये घडला आहे. कार्तिक धर या ट्विटर युजरने या बिलाचा फोटो शेअर केला आहे. त्यात ऑम्लेटची किंमत ८५० रुपये दाखवण्यात आली आहे. तर, कार्तिकने हा फोटो हॉटेल फोरसिझनच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केला आहे. त्याचवेळी राहुल बोसलाही टॅग करत, ‘भाई आंदोलन करें?’ असा प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे ट्विटरवर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली.

 

 

 

 

 

 

 

 

अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट करून हॉटेल फोरसिझनची खिल्ली उडवायलाय सुरुवात केली. ‘या अंड्यासोबत सोनंही बाहेर आलंय का?’ असा प्रश्न एकानं उपस्थित केलाय. तर एका युजरने अंडे देणारी कोंबडी कदाचित श्रीमंत घराण्यातील असावी, असं म्हटलंय. ‘घरातून तेल, मीठ, मिरेपूर घेऊन येण्याची माझी तयार आहे. मी पाच रुपये गॅसचे पैसे म्हणूनही देईन.’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

मॅरिएटला भरावा लागला दंड

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस चंदिगडमध्ये जेडब्लू मॅरिएटमध्ये गेला होता. तिथं हॉटेलनं दोन केळी घेतल्यानंतर त्याचं बिल ४४२.५० रुपये लावलं होतं. राहुलनं त्या बिलासह एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि सरकारी यंत्रणाही जोरात हालली. ट्विटरवर तर मॅरिएटची बदनामी झालीच झाली. पण, चंदिगडच्या एक्साईज आणि टॅक्सेशन विभागाने त्याची गंभर दखल घेत हॉटेलवर दंडात्मक कारवाईही केली. ४४२.५० रुपयांच्या बिलासाठी हॉटेलला सेंट्रल जीएसटी कायद्यातील कलम ११ चा भंग केल्याप्रकरणी २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागला. सोशल मीडियावर या कारवाईचेही कौतुक करण्यात आले. आता मुंबईच्या फोर सिझन हॉटेलवरही अशीच कारवाई होईल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
दोन उकडलेल्या अंड्यांची किंमत १७०० रुपये; बिल झाले व्हायरल Description: ट्विटरवर एका महागड्या हॉटेलचे बिल व्हायरल झाले आहे. बिलामध्ये एका ऑम्लेटचा दर ८५० रुपये तर, दोन उडकलेल्या अंड्यांचे बिल १७०० रुपये लावण्यात आले आहे. त्यावरून आता ट्विटरवर त्या हॉटेलला टार्गेट केलंय जातंय.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...