लग्न झालेल्या महिलांची Google वर नवऱ्यासंबंधी शोधाशोध, सर्च करताहेत 'या' खतरनाक प्रश्नाचं उत्तर

अशात गुगलवर कोण कधी काय सर्च करेल याचाही नेम लावता येत नाही. सध्या गुगलकडून एक नवीनच माहिती समोर आली आहे.

Marraige
Married Women Search these things on Google  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एखादा प्रश्न किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा झाल्यास आपण सगळेच गुगल करतो.
  • सध्या लग्न झालेल्या महिला गुगलवर काय सर्च करतात याची माहिती समोर आली आहे.
  • सध्या गुगलकडून एक नवीनच माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली: एखादा प्रश्न किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा झाल्यास आपण सगळेच गुगल करतो. काहीही शोधण्यासाठी गुगलचा वापर केला जातो. कोणत्याही गोष्टीचं उत्तर न मिळाल्यास थेट गुगलवर सर्च केलं जातं. पण अशात गुगलवर कोण कधी काय सर्च करेल याचाही नेम लावता येत नाही. सध्या गुगलकडून एक नवीनच माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीत लग्न झालेल्या महिला गुगलवर नेमकं काय शोधत असतील, याचा तुम्हीही नेम लावला नसेल. 

सध्या लग्न झालेल्या महिला गुगलवर काय सर्च करतात याची माहिती समोर आली आहे. महिला जे काही सर्च करत आहेत हे समजल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही. विवाहित महिला गुगलवर नक्की काय सर्च करतात हे नेमकं जाणून घेऊया. 

Google नं दिलेल्या डेटानुसार, नवऱ्याला काय पसतं आहे, ही गोष्ट लग्न झालेल्या महिला सर्वात जास्त सर्च करतात. नवऱ्याची आवड-निवड काय आहे. त्याला काय आवडत नाही. हे गुगलवर सर्च करणारे खूप सामान्य प्रश्न आहेत. सध्याच्या घडीला गुगलवर सर्वात जास्त प्रश्न विचारला जात आहे की, लग्न झालेल्या महिला आपल्या पतीचं मन कसं जिंकणार, तसंच पतीला आनंदी कसं ठेवता येईल, हे देखील प्रश्न सर्वांत जास्त सर्च करणाऱ्या प्रश्नाच्या यादीत समाविष्ठ आहेत. 

आता मात्र सध्या असा एक प्रश्न गुगलवर सर्च केला जात आहे, तो वाचून सर्वांनाच धक्का बसेल. तो म्हणजे, नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं. त्यासाठी कोणत्या टीप्स आहेत. हा प्रश्न सतत गुगलवर सर्च केल्याचं आढळून आलं आहे. 

नवऱ्याला जोरु का गुलाम कसं करायचं

सध्या लग्न झालेल्या महिला गुगलवर सर्च करत आहेत की, आपल्या पतीला मुठीत कसं ठेवायचं. नवऱ्याला जोरू का गुलाम कसं बनवायचं. इतकंच काय तर आपलं कुटुंब वाढवण्याचा निर्णय कधी आणि केव्हापर्यंत घ्यायचा. बाळाला जन्म देण्यासाठी योग्य वेळ कोणती?, यासारखे प्रश्न विचारले जातात. 

विवाहित महिला हे प्रश्न गुगलला विचारताहेत. 

लग्नानंतर आपल्या नवीन कुटुंबात कसं वागायलं हवं?
नव्या कुटुंबाचा भाग, सासरचा भाग कसं बनू शकतो?
आपल्या कुटुंबाची जबाबदारी कशाप्रकारे घेतली जावू शकते?
आपला स्वतःचा बिझनेस लग्नानंतर कसा चालवला जाऊ शकतो?
नोकरी सोबत कुटुंबांना कसा वेळ देता येऊ शकता येतो?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी