how to identify artificially ripened mangoes : उन्हाळा संपून पावसाळ्याला सुरुवात होईल. पण आंबे आणखी काही आठवडे बाजारात मिळतील. कोकणचा हापूस आंबा मिळण्याचे प्रमाण कमी होत जाईल त्याऐवजी सफेदा, केसर हे आंबे जून महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतील. पण आंबे खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
वेबस्टोरी : कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा ओळखण्याचे तंत्र
वेबस्टोरी : भारतीय आंब्याचे १० प्रकार
बाजारात जसे प्रामाणिक विक्रेते आहेत तसेच झटपट नफा कमावण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणारे विक्रेतेही आहेत. झटपट नफा कमावू इच्छिणारे विक्रेते कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे विक्रीसाठी आणतात. हे आंबे प्रतिबंधीत कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवलेले असतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका असतो. ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
अधिक वाचा : प्रभासचा 'आदिपुरुष' बिग बजेट सिनेमा
कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवलेले आंबे हे नैसर्गिकरित्या नाही तर कृत्रिमरित्या पिकवलेले असतात. यामुळे नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे कमी गोड असतात. हे आंबे खाल्ल्यावर काही वेळा त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे ओळखता येणे आवश्यक आहे. हे ओळखणे जमले तर ग्राहकांची फसवणूक टळेल.