कोरोना आहे की नाही कसं ओळखावं?, 'या' डॉक्टराने सांगितलं सोप्या भाषेत [VIDEO]

Know coronavirus symptoms: गाझियाबादचे डॉक्टर अंशुल वार्ष्णेय यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या रुग्णांना कोरोना आहे की नाही हे कसे ओळखता येईल हे सांगत आहेत. 

how to identify if there is a corona or not simply explained by dr anshul 
कोरोना आहे की नाही कसं ओळखावं?, 'या' डॉक्टराने सांगितलं सोप्या भाषेत [VIDEO]  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: जेव्हापासून कोरोना व्हायरस वा प्रादुर्भाव वाढला आहे तेव्हापासून भीतीबरोबरच लोकांमध्ये उत्सुकता देखील दिसून येत आहे. सोशल मीडियापासून ते टेलिव्हिजनपर्यंत अनेक ठिकाणी याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोना कसा होता, कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा हे याबाबत अनेक व्हॉट्सअॅप मेसेज आपल्याल पाहायला मिळत आहे. दरम्यान, बहुतेक डॉक्टरांनी असं आवाहन केलं आहे की, लोकांनी घाबरुन न जाता सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. अद्याप कोरोनावर कोणतंही औषध तयार झालेलं नाही. परंतु असं नाही की कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण बरा होत नाही. आतापर्यंत अनेक रुग्ण हे बर झाल्याचं समोर आलं आहे. 

दरम्यान, एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर आपल्या रुग्णांना सांगत आहे की, कोरोनाची लागण झाली आहे हे कसं ओळखावं. या डॉक्टरचं नाव अंशुल वार्ष्णेय असं आहे.

२ मिनिट ५३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, व्हॉट्सअॅप आणि नेटवररुन कोरोनाबाबत ज्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्या मी सांगणार नाही. मी आपल्याला सांगणार आहे की, तुम्हाला कोरोना आहे की नाही हे आपण कसं ओळखावं. त्यानंतर तुम्ही स्वत: पाहा की, ती लक्षणे आपल्यामध्ये आहेत की नाही. 

व्हिडिओ पाहून आपल्याला समजेल की कोरोनाची लक्षणे कोणती आहेत. डॉक्टर अंशुल म्हणतात की याची भीती बाळगण्याची गरज नाही. कोरोना येतो आणि जातो. हा  वयस्कर व्यक्ती, आजारांशी लढण्याची क्षमता कमी असणाऱ्या व्यक्ती किंवा इतर काही रोग असणाऱ्यांसाठी कोरोना घातक आहे. 

भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या ११० पर्यंत वाढली आहे. तर यामुळे २ लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत १३ जणं बरेही झाले आहेत. जगभरात १,७०,००० पेक्षा जास्त लोक संक्रमित आहेत. यापैकी ६,५०० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. तर ७७००० पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

दरम्यान, अनेक राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल यासोबत आता पुरातन वस्तू संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सध्या ३७ रूग्ण आढळून आले आहेत. संशयित रूग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या काही दिवसात राज्यभरातील धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...