Highest Slow Train: जेव्हा जेव्हा आपल्या लांब फिरायला जाण्याचा विचार येतो तेव्हा पहिल्यांदा विमान आठवते. पण विमानाचे दर सर्वांना परवडणारे असतीलच असं नाही. मग भारतीय रेल्वे यावरील सर्वोत्तम उपाय. स्वस्त, सुरक्षित, आणि आरामदायी प्रवासासाठी भारतातील बहुतांश लोक रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. ना ट्राफिक जामचे टेन्शन ना अपघाताची भीती. त्यातही जलद आणि वेळेवर पोहचवणारी रेल्वे म्हणून ओळखलं जातं.
पण आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अशा एका गाड्यांबद्दल सांगणार आहोत, जी म्हणायला तर एक्स्प्रेस आहे, पण ती प्रत्येक स्टेशनवर थांबतं जाते. ती तिच्या प्रवासात एकूण 111 रेल्वे स्टेशन्सवर थांबत जाते. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करताना तुमचं नियोजन नक्कीच चुकू शकते.
'हावडा-अमृतसर' मेल
'हावडा-अमृतसर' मेल असं या गाडीचं नावं आहे. बंगाल आणि पंजाब दरम्यान धावणारी ही एक्स्प्रेस गाडी आहे. ही गाडी पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि हरियाणा मार्गे पंजाबला जाते.
अधिक वाचा: भारतातील एका स्टेशनचं नाव आहे मस्जिद, काय आहे या नावामागील स्टोरी
अडीच दिवसांचा वेळ घेते 'हावडा-अमृतसर' मेल
हावडा ते अमृतसर हे अंतर अंदाजे 2 हजार किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यासाठी या गाडीला सुमारे 37 तास लागतात. म्हणजे जवळपास अडीच दिवस लागतात. ही गाडी हावडा स्टेशनवरून संध्याकाळी 7.15 वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 8.40 वाजता अमृतसरला पोहोचते. त्याचप्रमाणे, अमृतसरमधून संध्याकाळी 6.25 वाजता सुटते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता हावडा स्टेशनवर पोहोचते.
तिकिट दर कसे आहेत?
जर तुम्ही हावडा-अमृतसर मेलच्या स्लीपर क्लासने प्रवास करणार असाल तर 735 रुपये तिकिट आहे. थर्ड एसीचे तिकिट 1 हजार 950 रुपये आणि सेकंड एसीचे तिकिट 2 हजार 835 रुपये आहे. फर्स्ट क्लास एसीचे तिकिट 4 हजार 835 रुपये आहे. ही रेल्वे देशाच्या पश्चिम भागाला पूर्वेकडील भागाशी जोडण्याचे काम करते.
एकूण 111 स्थानकांवर थांबते
ही गाडी एक्सप्रेस असूनही 10, 20 किंवा 50 नाही तर तब्बल 111 रेल्वे स्टेशन्सवर थांबते. त्यामुळे, तुम्ही म्हणू शकता की या गाडीला प्रत्येक मोठ्या स्टेशन्स आणि शहरांमध्ये थांबे आहेत. त्याचवेळी दिब्रुगड-कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस,ही भारतातील सर्वात लांब मार्गावर धावणारी गाडी म्हणून ओळखली जाते. ही गाडी 9 राज्यांचा प्रवास करून 4 हजार 234 किलोमीटरचे अंतर कापते.