Snake Bite Effect: सापाचं विष (Snake venom) हे जीवघेणं आणि भयंकर असल्यामुळे अनेकजण त्याला घाबरत असतात. सगळेच साप विषारी (Poisonous) नसले, तरीदेखील सर्वसामान्यांना त्यातील फरक कळत नसल्यामुळे सर्वच सापांना लोक टरकून असतात. साप दिसला की अनेकजण तिथून पळ काढतात. काहीजणांना तर त्याच्या कल्पनेनंही घाम फुटायला सुरुवात होते. काहीजण तर साप दिसला की त्याला मारायला धावतात. सापाचं विष किती भयंकर असू शकतं, याची कल्पना अनेकांना असते. अनेकांनी साप चावल्यानंतर कशा प्रकारे माणसाचा मृत्यू होतो, हेदेखील पाहिलेलं असतं. सध्या सापाच्या विषाची माणसाच्या रक्तावर नेमका काय परिणाम होतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. माणसाला विषारी साप चावल्यानंतर तो का मरतो, हे या व्हिडिओतून स्पष्टपणे समजून येतं, असा दावा करण्यात आला आहे.
या व्हिडिओत एक व्यक्ती साप पकडून त्याचं विष काढताना दिसते. सापाला त्याने एका हातात पकडलं असून साप बाटलीच्या झाकणावर आपला फणा मारताना दिसतो. या प्रयोगासाठी तयार कऱण्यात आलेल्या या बाटलीत सापाचं विष काढून घेतलं जातं. साप आपल्यावर आलेलं संकट आहे, असं समजून त्या बाटलीला डंख मारतो आणि विषाचा फवारा त्यात सोडतो. आता प्रयोगासाठी सापाचं विष तयार असतं. या विषाचा माणासाच्या रक्तावर नेमका काय परिणाम होतो, हे पुढे दिसणार असतं.
अधिक वाचा - Influencer Earning: जागेपणी आराम, झोपेत कमाई! झोपेच्या भांडवलावर कमावतो महिन्याला 28 लाख
या प्रयोगात सापाचं एका बाटलीत साठवलेलं विष घेतलं जातं. दुसऱ्या एका ग्लासमध्ये माणसाचं रक्त घेतलं जातं. हे रक्त पातळ असून सहजरित्या प्रवाही असल्याचं सुरुवातीला दिसतं. याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओतील व्यक्ती ग्लासमधील ते रक्त ढवळून दाखवते आणि ते मानवी रक्त नॉर्मल असल्याचं दाखवते. त्यानंतर सापाच्या विषाचा एक थेंब त्या रक्तात टाकला जातो.
नेहमीप्रमाणे पातळ असणाऱ्या रक्तात विषाचा थेंब टाकल्यानंतर त्या रक्ताचं स्वरुप हळूहळू बदलायला सुुरुवात होते. अगोदर सहजरित्या ग्लासमध्ये फिरणारं आणि पातळ असणारं रक्त हळूहळू घट्ट व्हायला तयार होतं. त्यानंतर या रक्ताशी अक्षरशः गुठळी तयार होते. व्हिडिओतील व्यक्ती हे रक्त ग्लासमधून दुसऱ्या भांड्यात ओतते. मात्र पातळ रक्त न पडता रक्ताची गुठळीच खाली पडल्याचं दिसतं.
अधिक वाचा - Viral Video: आई करत होती डान्स, मुलगा शूट करत होता रील आणि मग…! पाहा धमाल व्हिडिओ
सापाच्या विषाचा माणसाच्या रक्तावर नेमका काय परिणाम होतो आणि माणसाचा मृत्यू का होतो, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सापाची धास्ती घेतली आहे. सध्या अनेकजण हा व्हिडिओ एकमेकांना फॉर्वर्ड करत असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.