भुकेने व्याकूळ झालेल्या मगरीने अशी केली कुत्र्याची शिकार, पाहा व्हिडिओ [VIDEO]

व्हायरल झालं जी
Updated May 29, 2021 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

चंबळ नदी ही तिच्यातल्या मगरींच्या वास्तव्यासाठी ओळखली जाते. इथे भुकेने व्याकूळ झालेल्या एका मगरीने ज्याप्रकारे निर्धास्तपणे वावरत असलेल्या एका कुत्र्याला शिकार बनवले त्याचा हा व्हिडिओ आपल्याही अंगावर काटा आणेल.

Crocodile kills dog
भुकेने व्याकूळ झालेल्या मगरीने अशी केली कुत्र्याची शिकार  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • मगरीने पाठलाग करून केली कुत्र्याची शिकार
  • क्लिप तयार करणारा म्हणतो- अडकला कुत्रा
  • दोन वर्षांपूर्वी आला होता अजगराचा व्हिडिओ

नवी दिल्ली: पाण्यात (Water) राहून मगरीशी (crocodile) वैर (enmity) घेऊ नये ही म्हण (saying) आपण ऐकतोच. चंबळ नदी (Chambal river) ही त्यांची वस्ती (habitat) म्हणूनच प्रसिद्ध आहे. तिथूनच एक असा व्हिडिओ (video) समोर आला आहे जो अंगावर काटा (goose bumps) आणणारा आहे. इथली एक मगर इतकी भुकेलेली (hungry) होती की तिने कुत्र्याची (god) शिकार (pray) केली. यात दिसत आहे की या मगरीने आपल्या मजबूत जबड्यांनी (strong jaws) या कुत्र्याला पकडले. चंबळ नदीत एका मगरीने कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होत आहे. यात दिसत आहे की ही मगर कुत्र्याच्या जवळ आली आणि तिने त्याच्यावर हल्ला (attack) केला. हा व्हिडिओ राजस्थानच्या (Rajasthan) कोटाच्या नजिकच्या रावतभाटा इथला असल्याचे बोलले जात आहे. (Hungry crocodile kills dog, watch video)

मगरीने पाठलाग करून केली कुत्र्याची शिकार

दीड मिनिटाच्या या व्हिडिओत दिसत आहे की एक कुत्रे नदीच्या किनाऱ्यावर फिरत आहे. तेव्हा एक मगर त्याच्याजवळ येते. व्हिडिओ रेकॉर्ड करणारा म्हणतो, "पाहा, ती येत आहे!" कुत्र्याला मात्र याचा काहीच पत्ता नाही. तो नदीच्या किनाऱ्यावर फिरतच आहे. मगर पोहत पोहत त्याच्याजवळ जाते. कॅमेरावाला म्हणतो, “ती मगर हुशार आहे. कुत्र्याला मात्र कशाचाच पत्ता नाही.”

क्लिप तयार करणारा म्हणतो- अडकला कुत्रा

जेव्हा हा कुत्रा किनाऱ्यावर पडलेल्या एका होडीपाशी जातो, तेव्हा व्हिडिओ चित्रित करणारा म्हणतो, "अडकला हा. आता त्याच्यावर हल्ला केला जाईल." मगर पुन्हा एकदा कुत्र्याच्या जवळ येते आणि वेगाने त्याला आपल्या जबड्यांनी पकडते. तिच्या तोंडात जाण्याआधी कुत्रा फक्त ओरडू शकतो. व्हिडिओ संपण्याच्या आधी एक माणूस सांगतो की ती मगर त्याला घेऊन गेली.

दोन वर्षांपूर्वी आला होता अजगराचा व्हिडिओ

ऑक्टोबर 2019मध्ये गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातल्या एका घराच्या मागच्या परिसरात घुसून एका नऊ फुटांच्या अजगराने एका गोलमटोल मांजराचा असाच फडशा पाडला होता. नंतर त्याने या मांजराला बाहेर काढले. खूप प्रयत्नांनंतर स्थानिकांनी या अजगराला पकडले आणि सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी