जेवण नाकारल्याच्या रागातून डीलीट केले लग्नाचे फोटो

लग्न सोहळ्यात जेवण जेवण्यास परवानगी दिली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने लग्नाचे सर्व फोटो डीलीट केले. स्वतःच्या कृतीची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Hungry photographer deletes all photos right in front of groom after being denied food at wedding
जेवण नाकारल्याच्या रागातून डीलीट केले लग्नाचे फोटो 
थोडं पण कामाचं
  • जेवण नाकारल्याच्या रागातून डीलीट केले लग्नाचे फोटो
  • फोटो काढण्यासाठी मिळणार असलेल्या २५० डॉलरवर सोडले पाणी
  • फोटो डीलीट करणाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली: लग्न सोहळ्यात जेवण जेवण्यास परवानगी दिली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने लग्नाचे सर्व फोटो डीलीट केले. स्वतःच्या कृतीची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली. त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका मित्राने फोटोग्राफरवर होणारा मोठा खर्च वाचवण्यासाठी मित्राला २५० डॉलर देऊन फोटो काढण्यासाठी लग्नाला बोलावले. लग्न सोहळा सकाळी अकरा वाजता सुरू झाला आणि संध्याकाळी साडेसात वाजता संपला. लग्नात संध्याकाळी पाच वाजल्यापासून जेवणाला सुरुवात झाली. 

फोटो काढण्याच्या निमित्ताने सतत उभे राहिलेल्या व्यक्तीचे पाय दुखू लागले होते शिवाय त्याला प्रचंड भूक लागली होती. अखेर भूक असह्य झाल्यामुळे नवऱ्यामुलाला भेटून त्याने भूक लागल्याचे सांगितले. पण नवऱ्यामुलाने फोटो काढणाऱ्याच्या जेवणाची व्यवस्थाच केली नसल्याचे सांगितले. तू फोटो काढून २५० डॉलर घेऊन जाऊ शकतोस किंवा पैसे न घेता घरी जाऊ शकतो; असे नवऱ्यामुलाने फोटो काढणाऱ्यास सुनावले.

मैत्रीखातर फोटो काढत असलेल्या व्यक्तीला नवऱ्यामुलाचे शब्द खटकले. भूक लागली असताना जेवण जेवू दिले जात नाही. साधे पाणीही विचारले नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने २५० डॉलरवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने कॅमेऱ्यातील सर्व फोटो डीलीट केले आणि लग्न सोहळ्यातून तडक निघून गेला. 

लग्न सोहळ्यातून बाहेर पडल्यानंतर फोटो डीलीट करणाऱ्याने त्याच्या कृतीची माहिती सोशल मीडियातून जाहीर केली. या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी इतका टोकाचा निर्णय घेण्याची गरज नव्हती असे मत व्यक्त केले. तर काही जणांनी 'जो मित्राला फोटो काढण्यासाठी बोलावून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाच करत नाही त्याला मित्र कसे म्हणायचे', असा प्रश्न उपस्थित केला. 

लग्नाचे फोटो डीलीट झाल्याचे सांगून पैसे घेणे टाळायचे आणि ते फोटो गुपचूप फोटो स्टुडिओ, जाहिरात कंपन्या यांना मोठ्या किंमतीला विकून जास्तीत जास्त कमाई करायची असाही सल्ला एका व्यक्तीने फोटो डीलीट करणाऱ्याला दिला. पण हा सल्ला अनेक सोशल मीडिया युझरना पटला नाही. फोटो डीलीट करणाऱ्याने तर या प्रतिक्रियेला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

सोशल मीडियावर फोटो डीलीट करण्यावरुन उलटसुलट चर्चा सुरू असली तरी ज्याचे लग्न होते तो मात्र हनीमूनसाठी निघून गेला आहे. फोटो डीलीट करणाऱ्या मित्राशी त्याने अद्याप संपर्कच केलेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी