[Video] भांडण करताना बाल्कनीमधून खाली पडले पती-पत्नी आणि...

व्हायरल झालं जी
Updated May 31, 2021 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

caught on camera । भांडण करताना नवरा-बायको दोघेही बाल्कनीमधून खाली पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

viral video
भांडण करताना बाल्कनीमधून खाली पडले पती-पत्नी आणि... 

थोडं पण कामाचं

  • बाल्कनीमध्ये जेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले तेव्हा दोगेही रेलिंगवर पडले आणि ते तुटल्यामुळे ते २५ फूट खाली जमिनीवर पडले.
  • पती आणि पत्नी दोघांनाही रुग्णालयात भर्ती करण्यात आले. तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की रेलिंग इतक्या सहजतेने तुटली ज्याचा अंदाज लावणेही कठीण आहे.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

caught on camera ।  पीटर्सबर्ग : नवरा-बायकोमध्ये भांडण होणे ही सामान्य बाब आहे. मात्र रशियातील प्रसिद्ध शहर सेंट पीटर्सबर्गमध्ये जे घडले ते हैराण करणारे होते. Mirror Online  च्या बातमीनुसार येथे एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पती-पत्नीमधील भांडण इतके विकोपाला गेले की यामुळे दोघांचा जीव धोक्यात आला. (Husband and wife fell from balcony during fight between them)

सेंट पीटर्सबर्गमधील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारे ओल्गा वोल्कोवा आणि त्याची पत्नी येवगेनी कार्लगिन यांचे कोणत्यातरी गोष्टीवरून भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की दोघांमध्ये हाणमारी सुरू झाली. दोघेही भांडत भांडत फ्लॅटच्या बाल्कनीपर्यंत आले. 

बाल्कनीमध्ये जेव्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झाले तेव्हा दोगेही रेलिंगवर पडले आणि ते तुटल्यामुळे ते २५ फूट खाली जमिनीवर पडले. अपघात घडताच लोकांची मोठ्या संख्येने तेथे गर्दी झाली. फोन करून तातडीने अॅम्ब्युलन्सला बोलावण्यात आले. 

पती आणि पत्नी दोघांनाही रुग्णालयात भर्ती करण्यात आले. तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की रेलिंग इतक्या सहजतेने तुटली ज्याचा अंदाज लावणेही कठीण आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले की पती-पत्नी यांच्यात जोरदार भांडण सुरू होते. दोघांमध्ये हाणामारी सुरू होती. त्याच दरम्यान हा अपघात घडला. 

या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीस अधिकारीही तेथे पोहोचले. तसेच याबाबीचा तपास केला जात आहे की रेलिंग नेमकी तुटली कशी?

प्रत्यक्षदर्शी डेनिसने येथील स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मी आपल्या सहकाऱ्यासोबत चालत होतो. या दरम्यान ती रस्त्याचा व्हिडिओ बनवत होती. अचानक तिचे लक्ष बाल्कनीमध्ये भांडत असलेल्या नवरा-बायकोकडे गेले. त्यानंतर हा व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये शूट झाला. 

दरम्यान, बाल्कनीमधून खाली पडल्याने दोघेही पती-पत्नींना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी