कोंबडीच्या तीन अंड्यांवरून पती-पत्नीत भांडण, पोलिसांत गेले प्रकरण; पोलिसांनी 'असा' सोडवला तिढा

व्हायरल झालं जी
Updated Feb 07, 2021 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

पती-पत्नीमध्ये छोटी छोटी भांडणे तर होतातच, पण जर ते अंड्यांवरून भांडू लागले तर आश्चर्य वाटतेच. असेच आश्चर्य पोलिसांनाही वाटले जेव्हा अशीच एक तक्रार घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले.

Eggs
कोंबडीच्या तीन अंड्यांवरून पतीपत्नीत झाले भांडण, पोलिसात गेले प्रकरण, पोलिसांनी असा सोडवला तिढा  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • भांडणाचे कारण ऐकून पोलिसही पडले बुचकळ्यात
  • अंड्यांवरून भांडले पती-पत्नी
  • अशा प्रकारे पोलिसांनी सोडवला अंड्यांवरुन निर्माण झालेला वाद

मुंबई: संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही म्हण अंड्यांमुळे (Eggs) आरोग्याला होणाऱ्या फायद्यांमुळे (health benefits) आपण अनेकदा ऐकली असेल, पण याच अंड्यांवरून पती-पत्नीमध्ये (husband-wife) भांडण (quarrel) झाल्याचे ऐकले नसेलच. महाराष्ट्रात (Maharashtra) घडलेली ही गंमतीशीर घटना आहे जिथे एक जोडपे तीन अंड्यांवरून एकमेकांशी भांडले. भांडण इतके वाढले की शेवटी हा प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत (police station) गेला आणि नंतर असे काही झाले जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

भांडणाचे कारण ऐकून पोलिसही पडले बुचकळ्यात

हा प्रकार महाराष्ट्राच्या बुलढाण्याच्या साखरखेरडा या गावातला आहे. जेव्हा हे जोडपे आपली जगावेगळी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा सुरुवातीला पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. पण जेव्हा त्यांना यामागचे कारण कळले तेव्हा की ते अंड्यांवरून भांडत आहेत तेव्हा मात्र त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी मोठ्या उत्सुकतेने सर्व प्रकार ऐकून घेतला.

अंड्यांवरून भांडले पती-पत्नी

त्यांनी पोलिसांना जे काही सांगितले ते ऐकून आपल्यालाही हसू आवरणार नाही. ज्या तीन अंड्यांवरून त्यांचे भांडण झाले ती अंडी या पतीने बाजारातून आणली होती. त्याने पत्नीला त्या अंड्यांची बुर्जी बनवायला सांगितले. तिने बुर्जी बनवली, आणि ती तिच्या मुलीला फारच आवडल्याने तिने सगळी बुर्जी तिलाच देऊन टाकली. नंतर पतीने घरी येऊन बुर्जी मागितली आणि ती संपून गेल्याचे कळताच तो भडकला. त्याने पत्नीशी भांडण करण्यास सुरुवात केली. भांडण इतके विकोपाला गेले की हे जोडपे पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे पोलिसांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नंतर मोठ्या चतुराईने त्यांचे भांडण सोडवूनही टाकले.

असे सोडवले पोलिसांनी अंड्यांचे भांडण

साखरखेरडाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून तीन अंडी मागवली आणि ती भांडणाऱ्या या जोडप्याला देऊन त्यांचे भांडण मिटवले. या जोडप्यातला पती हा बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री म्हणून काम करतो आणि त्याच्या कमाईवर घर चालते. त्यामुळे जेव्हा आपल्या मेहनतीच्या पैशातून आणलेल्या अंड्यांची बुर्जी त्याला मिळाली नाही तेव्हा त्याला राग आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी