मुंबई: अयोध्या (Ayodhya)मध्ये भव्य राम मंदिर (Ram Mandir)ची निर्मिती होत आहे. अशातच अनेक श्रद्धाळू लोक तेथे दर्शनासाठी जात असतात. मात्र येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील सरयू नदीत (Sarayu River) पती-पत्नी स्नान करत होते. यातच पतीने आपल्या पत्नीला सर्वांसमोर किस(kiss) केले. मात्र तेथे उपस्थित लोकांनी हे पाहिले आणि त्यांनी याला विरोध दर्शवला. त्या पतीची चांगलीच धुलाई केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Husband kiss his wife during bath in sarayu river, people beat him
अधिक वाचा - 'जुग जुग जीयो'सिनेमाच्या निमित्ताने
या व्हिडिओत पती०पत्नी सरयू नदीत लोकांमध्ये आंघोळ करताना दिसत आहे. या दरम्यान पतीने पत्नीला किस केले. मात्र हेच त्याला खूप महागात पडले. त्याच्या पत्नीने हा विचारही केला नसेल की हा किस किती भारी पडू शकतो. तिच्या पतीची तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी चांगलीच धुलाई करण्यास सुरूवात केली. एकानंतर एक तरूण त्या पतीला मारत होते. सरयू नदीला वॉटर पार्क समजणे या नव दाम्पत्याला असा धडा देऊन गेले की ते आयुष्यात कधीही विसरणार नाहीत.
अयोध्या: सरयू में स्नान के दौरान एक आदमी ने अपनी पत्नी को किस कर लिया. फिर आज के रामभक्तों ने क्या किया, देखें: pic.twitter.com/hG0Y4X3wvO — Suneet Singh (@Suneet30singh) June 22, 2022
ही घटना मंगळवारची आहे. सरयू नदीच्या किनाऱ्यावरही मंगळवारी योगा डेच्या दिवशी अभ्यास झाला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव या कार्यक्रमात सामील होते. मंत्री गेल्यानंतर दोन तासांनी ही घटना घडली. रात्री उशिरा याचे व्हिडिओ समोर आले.
अधिक वाचा - ही आव्हानाची नव्हे संवादाची वेळ, भास्कर जाधवांचा सल्ला
विरोध करणाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते अशातच पती-पत्नीने अशी अश्लीलता पसरवणे बरे नव्हे. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी असे काही करू नये. सूचना मिळताच लक्ष्मण घाट चौकीचे पोलीस यांनी या प्रकरणात बोलण्यास नकार दिला. त्या पतीचे वयन ३० वर्षे. सुमारे २० मिनिटे त्याला २-३ लोकांनी मारले. यामध्ये त्याचा चेहरा, खांदा आणि पाठीवर दुखापत झाली आहे.