नवरा फारच प्रेम करतो म्हणून महिलेने मागितला घटस्फोट

व्हायरल झालं जी
Updated Aug 22, 2020 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

यूपीच्या संबळमध्ये एका महिलेने तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करतो आणि या सगळ्यामुळे तिची घुसमट होत असल्याचे सांगत शरिया न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला आहे.

Husband loves too much, cannot live with him, says woman, files divorce on the same grounds
‘नवरा करतो फारच प्रेम, नाही राहायचे त्याच्यासोबत’, महिलेने हे कारण देत मागितला घटस्फोट, कोर्टही हैराण  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • यूपीच्या संबळमधून समोर आला विचित्र प्रकार
  • एका महिलेने शरिया कोर्टात केला घटस्फोटाचा अर्ज
  • तिने दिलेले कारण ऐकून मौलवीही झाले हैराण

संबळ: कुठल्या पत्नीला पतीने आपल्यावर खूप प्रेम केलेले आवडणार (every wife wants her husband to love her) नाही? पण उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) संबळ जिल्ह्यातून (Sambal district) एक अजब प्रकार समोर आला आहे, जिथे पत्नीला आपल्या पतीचे प्रेम तिची घुसमट करणारे वाटते (wife finds husband’s love suffocating) आणि या कारणामुळे ती त्याच्यासोबत राहण्यास तयार नाही (not ready to live with him). इतकेच नव्हे, तर याच कारणाने तिने शरिया कोर्टात घटस्फोटाचा (files application for divorce in Shariya court) अर्जही केला आहे, जे ऐकून मौलवीही हैराण (Maulavis amazed) झाले आहेत.

पती भांडत तर नाहीच, उलट घरच्या कामातही मदत करतो 

हा प्रकार उत्तर प्रदेशातल्या संबळ जिल्ह्यातला आहे, जिथे एका महिलेने विवाहाच्या १८ महिन्यांनंतर तिचा पती तिच्याशी भांडत नसून तिच्यावर खूप प्रेम करतो असे सांगत शरिया न्यायालयात घटस्फोटाचा (तलाक) अर्ज केला आहे. तिचा पती तिच्या चुकाही माफ करतो आणि तिची प्रत्येक गोष्ट हसत हसत मान्य करतो. घरातील कामांमध्येही तिला मदत करतो आणि कधीकधी तिच्यासाठी जेवणही बनवतो.

‘घुसमट करणारे वाटते पतीचे प्रेम’

या महिलेचे म्हणणे आहे की पतीच्या अशा वागण्यामुळे ती नाखुश आहे आणि आपल्या वैवाहिक आयुष्यात तिची घुसमट होते आहे. त्यामुळे ती पतीसोबत राहू इच्छित नाही आणि तिला तलाक हवा आहे. शरिया न्यायालयातील मौलवींना जेव्हा तिने तलाकसाठीचे कारण सांगितले, तेव्हा तेही चक्रावून गेले. त्यांनी या महिलेच्या पतीची बाजूही ऐकून घेतली, ज्याने न्यायालयात सांगितले की तो त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि कायम तिचा आनंदच त्याला हवा आहे.

समजुतीने मार्ग काढण्याचा दिला दाम्पत्याला सल्ला

दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर शरिया न्यायालयाने या महिलेचा अर्ज रद्द ठरवला. पण ही महिला थोडीच शांत बसणार होती? तिने तिची बाजू गावच्या पंचायतीसमोर मांडली. तिथेही तिचे म्हणणे ऐकून लोक बुचकळ्यात पडले. हा प्रकार पंचायतीच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे सांगत पंचायतीने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सध्या या दोघांना आपापसात समजुतीने हा प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला गेला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी