रात्री झोपेत पतीच्या स्वप्नात आली दुसरीच महिला अन् मग संतप्त झालेल्या पत्नी जबरदस्त बदला

Dream in Night: रात्री झोपेत काहींना दररोज स्वप्न पडतात तर काहींना कधी-कधीच स्वप्न पडतात. काही स्वप्न ही त्यांच्या मनासारखी असतात तर काही स्वप्नांमुळे ते खडबडून जागे होतात. 

Representative Image
Representative Image (Photo: Google Play) 
थोडं पण कामाचं
  • पतीच्या स्वप्नात आली दुसरीच महिला
  • पतीच्या शेजारीच उभी राहून पत्नी ऐकत होती त्याचा झोपेतील संवाद 
  • पतीच्या स्वप्नातील महिलेबाबत कळताच संतप्त पत्नीने घेतला बदला

मुंबई : पती आणि पत्नी यांच्यात वाद झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल, लहान-मोठ्या कारणांमुळे भांडणं होतच असतात. काही वाद इतके वाढतात की, त्यामुळे हाणामारी आणि कोर्टाच्या पायऱ्याही चढाव्या लागतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका दाम्पत्याबाबत सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. झालं असंकी, पतीने पाहिलेल्या स्वप्नामुळे पत्नीचा राग अनावर झाला आणि मग तिने त्या पतीला अद्दल घडवायचं ठरवलं.

ही घटना बोलिविया येथे घडली आहे. तेथील पाज नावाच्या शहरात एका पत्नीने आपल्या पतीच्या अंगावर गरम पाणी आणून ओतलं. त्या मागचं कारण म्हणजे पतीने पाहिलेलं स्वप्न ठरलं आहे. झालं असं की, पती झोपेत असताना त्याच्या स्वप्नात एक दुसरीच महिला आली. स्वप्नात असलेला पती त्या महिलेसोबत रोमान्स करु लागला आणि आपलं प्रेम व्यक्त करु लागला. पतीचा आवाज ऐकल्यावर त्याच्या पत्नीला कळालं की, तो इतर महिलेच्या बाबत बोलत आहे.

हे पण वाचा : सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिममध्ये द्यायचा ट्रेनिंग अन् रात्र होताच करायचा असं काही की...

यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने गरम पाणी आणले आणि आपल्या पतीच्या अंगावर ओतले. ज्यावेळी पत्नीने पतीच्या अंगावर पाणी ओतले त्यावेळी तो पती गाढ झोपेत होता. स्वप्न पाहत असलेल्या पतीच्या अंगावर अचानकपणे गरम पाणी पडल्याने तो खडबडून जागा झाला. गरम पाणी ओतल्यामुळे तो चांगलाच होरपळला आहे.

TN International च्या वृत्तानुसार, महिलेने आपल्या पतीच्या अंगावर गरम पाणी ओतल्यानंतर स्वत:हून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेते. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. त्यानंतर या महिलेने संपूर्ण घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. महिलेने पोलिसांना सांगितले की, ज्यावेळी माझा पती गाढ झोपेत होता त्यावेळी तो दुसऱ्या महिलेचं स्वप्न पाहत होता. इतकेच नाही तर तिच्यासोबत तो स्वप्नात रोमान्स करत होता आणि प्रेमही व्यक्त करत होता. मी त्याच्या शेजारीच उभी होती. प्रेम व्यक्त करताना तो जे बोलत होता ते ऐकल्यावर मी रागाच्या भरात किचनमध्ये गेली आणि गरम पाणी आणून त्याच्या अंगावर ओतले. 

या महिलेने पुढे सांगितले की, गरम पाणी अंगावर ओतल्याने तो खूपच होरपळला. त्यानंतर मी त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले. अंगावर गरम पाणी टाकल्याने त्याची पाठ, हात आणि कमरेखालील भाग होरपळला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी