पतीला अधिकाऱ्यांना सलाम करताना पाहिलं, अन् दोन मुलांची आई झाली IPS

IPS officer N. Ambika was a victim of child marriage : असे म्हणतात की, मनापासून कठोर इराद्याने आणि खंबीर इराद्याने मेहनत केली तर यश तुमच्या पायांशी लोटांगण घातले. त्यात एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आयपीएस एन. अंबिका आहेत.

I saw her husband saluting the authorities, and IPS became the mother of two children
पतीला अधिकाऱ्यांना सलाम करताना पाहिलं, अन् दोन मुलांची आई झाली IPS   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • एन. अंबिकाचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी दिंडीकाल येथील पोलीस हवालदाराशी झाला
  • वयाच्या १८ व्या वर्षी ती दोन मुलांची आई झाली. 
  • सर्व काही ठीक चालले होते, की एका घटनेने अंबिकाला आयपीएस बनण्याची प्रेरणा दिली.  

मुंबई  : असे म्हणतात की, मनापासून कठोर इराद्याने आणि खंबीर इराद्याने मेहनत केली तर यश तुमच्या पायांशी लोटांगण घातले.  ही वस्तुस्थिती खरी असल्याचे आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांनी. तामिळनाडूचे रहिवासी एन. अंबिकाचे वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झाले. वयाच्या १८ व्या वर्षी ती दोन मुलांची आई झाली. सर्व काही ठीक चालले होते, की एका घटनेने अंबिकाला आयपीएस बनण्याची प्रेरणा दिली.  (I saw her husband saluting the authorities, and IPS became the mother of two children)
 

वयाच्या 14 व्या वर्षी लग्न

एन. अंबिकाचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी दिंडीकाल येथील पोलीस हवालदाराशी झाला होता. त्याच वेळी, वयाच्या 18 व्या वर्षी ती दोन मुलांची आई बनली. लहान वयातच लग्न झाल्यामुळे अंबिका तिचे शालेय शिक्षण पूर्ण करू शकली नाही. ती आपल्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेण्यात व्यस्त होती आणि त्यातच आनंदी होती. त्यांच्या मनात कुठूनही आयपीएस होण्याचा विचार नव्हता, पण याच काळात घडलेल्या एका घटनेने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधून आयपीएस होण्याची प्रेरणा

एन. अंबिका म्हणाल्या की, एकदा त्या त्यांच्या कॉन्स्टेबल पतीसोबत प्रजासत्ताक दिनाची पोलिस परेड पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी पतीला अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना सलाम करताना पाहिले. घरी आल्यानंतर अंबिका यांनी आपल्या पतीला याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की ते माझे उच्च अधिकारी (आयपीएस) आहे. अंबिका यांना त्यांच्या पतीने आयपीएस होण्याचा मार्ग आणि या पदावर मिळालेल्या सन्मानाची संपूर्ण माहिती दिली होती.

 
यूपीएससीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिकाने नागरी सेवांची प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पतीकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर अंबिकाने तिचा राहिलेला अभ्यास पुन्हा सुरू केला. खासगी कोचिंगच्या मदतीने त्यांनी प्रथम दहावीची परीक्षा दिली. यानंतर त्यांनी बारावी आणि डिस्टन्स लर्निंगमधून ग्रॅज्युएशन केले. यानंतर अंबिका यांच्या यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागल्या.

पतीने पाठिंबा दिला

अंबिका तिच्या कुटुंबासह दिंडीगुल नावाच्या एका छोट्या गावात राहत होत्या, जिथे यूपीएससीच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. त्यामुळे अंबिका यांनी चेन्नईत राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये त्यांच्या पतीनेही पूर्ण साथ दिली आणि अंबिकांना तिथे राहण्याची आणि शिकण्याची व्यवस्था केली. अंबिका तयारी करत असताना त्यांच्या पतीने नोकरीबरोबरच मुलांचाही सांभाळ केला.

यूपीएससी परीक्षेसाठी अंबिकाने खूप मेहनत घेतली. मात्र, त्यानंतरही त्या या परीक्षेत तीनदा नापास झाल्या. यामुळे त्यांचे पती आणि कुटुंबीयही निराश झाले होते. त्यांनी अंबिकांना घरी परतण्यास सांगितले, पण तरीही अंबिकाने हार मानली नाही. अंबिकाने पतीला शेवटची संधी द्यायला सांगितले. यासाठी त्यांच्या पतीने होकार दिला आणि अंबिकाचा शेवटचा प्रयत्न यशस्वी झाला.

एन. अंबिकाने 2008 मध्ये चौथा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्यांच्या मेहनतीला यश आले आणि त्यांनी UPSC 2008 ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या IPS अधिकारी बनल्या. एन. अंबिका यांना महाराष्ट्र केडरमध्ये पोस्टिंग मिळाली. अंबिका सध्या मुंबईतील झोन-4 च्या डीसीपी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी