IAS Dance Video Viral: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आयएएस अधिकारी डान्स करताना दिसत आहे. ही महिला आयएएस अधिकारी एका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक जण हे आयएएस दिव्या अय्यर यांचे जोरदार कौतुक करत आहेत. कारण त्या आपल्या नृत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना दिसत आहे. (ias dance video when female dm started dancing with students video went viral on internet)
खरं तर हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे, मात्र आज तो (रविवार) पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अधिक वाचा: Emotional Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, कानात मशीन लावताच डोळ्यात आले अश्रू
IAS अधिकाऱ्यांने विद्यार्थ्यांमध्ये भरला जोश
व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्याचे नाव दिव्या एस अय्यर (Divya S Iyer) आहे. ज्या सध्या केरळच्या पथनामथिट्टा जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) देखील आहेत. नुकतंच त्या महात्मा गांधी विद्यापीठाच्या कला महोत्सवाची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांचा एक गट नृत्याचा सराव करत होता. ज्यामध्ये त्या देखील मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी नृत्यात सामील झाल्या आणि स्वत: ठेका धरला. पाहा व्हिडीओ -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील महिला IAS अधिकाऱ्याचा डान्स लोकांना आवडला आहे. यावेळी महिला अधिकाऱ्याची विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले नृत्यकौशल्यही यावेळी लोकांना दाखवून दिलं आहे.
अधिक वाचा: Optical Illusion: करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाघ टप्प्यात येऊन बसलाय, पण तुम्हाला दिसतोय का?
या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'गोलियों की रासलीला-रामलीला' या चित्रपटातील 'नगाडा संग ढोल' हे लोकप्रिय गाणे वाजताना ऐकू येत आहे. ज्यावर आयएएस अधिकारी दिव्या एस अय्यर यांनी डान्स करून येथील अनेकांचं लक्ष वेधलं. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे फॉलोवर्स देखील वाढले आहेत. हा व्हिडिओ सध्या फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.