Viral: 'गुटखा खा आणि मिळवा पुरस्कार! यमराज असतील पुरस्काराचे प्रमुख पाहुणे, काय आहे प्रकरण? 

व्हायरल झालं जी
Updated May 14, 2022 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Photo | सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे फोटो लक्ष वेधून घेत असतात. यामध्ये काही फोटो असे असतात जी लोकांची मने जिंकतात. तर काही फोटो पाहून लोक थक्क झाले आहेत.

IAS officer Awanish Sharan shared a unique photo on Twitter
'गुटखा खा आणि मिळवा पुरस्कार! काय आहे प्रकरण?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे फोटो लक्ष वेधून घेत असतात.
  • सध्या असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
  • या फोटोमध्ये तंबाखू खाणाऱ्यांना विनोदी पद्धतीने इशारा देण्यात आला आहे.

Viral Photo | मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे फोटो लक्ष वेधून घेत असतात. यामध्ये काही फोटो असे असतात जे लोकांची मने जिंकतात. तर काही फोटो पाहून लोक थक्क झाले आहेत. पण सध्या असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण या फोटोमध्ये तंबाखू खाणाऱ्यांना विनोदी पद्धतीने इशारा देण्यात आला आहे. अनेकांना ही स्टाईल खूप आवडली आहे, तर अनेकजण त्यावर प्रचंड हसत आहेत. (IAS officer Awanish Sharan shared a unique photo on Twitter). 

जनजागृतीचा आगळावेगळा प्रयत्न

तंबाखूचे सेवन केल्याने कॅन्सरसारखे घातक आजार होतात. गुटख्याच्या पुडीवर खबरदारीचा इशारा लिहलेला असतो. दरम्यान असे असूनही लोक ते आनंदाने खातात. सरकारही याबाबत लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जागरूक करत असते. गुटख्यापासून मुक्ती मिळावी यासाठी सोशल मीडियावर एक मजेशीर फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गुटखा खाल्ल्यास काय बक्षीस मिळेल असे सांगण्यात आले आहे. हा फोटो पाहून तुम्हीही क्षणभर विचारात पडाल आणि गुटखा खाणाऱ्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

यमराज देणार बक्षीस

हा व्हायरल फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. फोटोमध्ये ठळक अक्षरात 'गुटका खाओ पुरस्कार पाओ' असे लिहिलेले दिसत आहे. त्या खाली पुरस्कारांचे तपशील देखील दिले आहेत. एवढेच नाही तर हा पुरस्कार कोण देणार आणि कुठे दिला जाणार हेही नमूद करण्यात आले आहे. हा फोटो शेअर करत आयएएस अधिकाऱ्याने लिहिले की ही एक चांगली कल्पना आहे. आतापर्यंत १२ हजार लोकांनी या हास्यास्पद फोटोला लाईक केले आहे. तर १,९०० हून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. सोबतच या फोटोवर लोक हास्यास्पद प्रतिक्रिया देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी