ऑनलाईन डेटिंग अॅपवर आहात का? मग धोक्यांपासून सावध रहा...

व्हायरल झालं जी
Updated Jan 28, 2020 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात तब्बल आठ लाख पुरूष आणि महिलांनी आपल्या साथीदाराला धोका दिल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये टेक्नॉलॉजी हब असलेले बंगळुरू शहरात असे प्रकार अधिक घडल्याचेही यात म्हटले आहे.

If You are using Online dating apps be aware from fraudsters
ऑनलाईन डेटिंग अॅपवर आहात का? मग धोक्यांपासून सावध रहा...  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतात तब्बल आठ लाख पुरूष आणि महिलांनी आपल्या साथीदाराला धोका दिल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.
  • डेटिंग अॅपवरील माहितीप्रमाणे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांनी आपल्या साथीदाराला धोका देण्याचा पर्याय निवडला आणि गैरसंबंधही जोडले.
  • फ्रेंच ऑनलाईन डेटिंग कम्युनिटी प्लॅटफॉर्मनुसार, अॅपवरील ट्राफिकमध्ये लग्न झालेल्या जोडप्यांची संख्या अॅपवर अधिक आहे.

नवी दिल्ली: लग्न करताना स्थळ बघून पारखून निवड करणे गरजेचे असते. अशात जर तुम्ही ऑनलाईन एखाद्या व्यक्तीशी ओळख करून घेत असाल, किंवा नात्याचा, डेटिंगचा विचार करत असाल तर मात्र तुम्ही पुन्हा विचार केला पाहिजे. कारण भारतात तब्बल आठ लाख पुरूष आणि महिलांनी आपल्या साथीदाराला धोका दिल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये टेक्नॉलॉजी हब असलेले बंगळुरू शहरात असे प्रकार अधिक घडल्याचेही यात म्हटले आहे.

डेटिंग अॅपवरील माहितीप्रमाणे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांनी आपल्या साथीदाराला धोका देण्याचा पर्याय निवडला आणि गैरसंबंधही जोडले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा जोडप्यांनी पुन्हा आपले नियमित काम सुरू केले आणि मुलांच्या सुट्ट्या संपल्या तेव्हा पुन्हा डेटिंग अॅपवर येणाऱ्यांची संख्या आणि ट्राफिक मोठ्या प्रमाणात वाढली.

२०१९ नोव्हेंबरमध्ये डेटिंग अॅप्सवर सर्वाधिक पुरूष हे बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा, विशाखापट्टणम, नागपूर, सूरत. इंदोर आणि भुवनेश्वर या शहरातील होते.

महलियांच्या बाबतीत बंगळुरू, मुंबई, दिल्ली, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोची, नोएडा, लखनऊ, इंदोर, सूरत, गुवाहाटी, नागपूर आणि भोपाळ ही शहरं टॉपवर आहेत.

फ्रेंच ऑनलाईन डेटिंग कम्युनिटी प्लॅटफॉर्मनुसार, अॅपवरील ट्राफिकमध्ये लग्न झालेल्या जोडप्यांची संख्या अॅपवर अधिक आहे. तसेच हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. डेटिंग अॅपचे युजर्स नवीन वर्षाच्या सुरूवातीदरम्यान अचानक वाढलेले दिसून आले. या अॅप्सवर चॅटिंग किंवा नवीन व्यक्तीशी बोलताना अनेक जोडप्यांनी आपल्या साथीदाराला धोका दिला आहे. तेव्हा ऑनलाईन लग्न जुळवणे असो किंवा डेटिंग दोन्हीपासून सावध राहणे गरजेचे आहे.

जानेवारी २०२०च्या पहिल्या आठवड्यात डेटिंग अॅप्सचे रोजचे सबस्क्रिप्शन मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत ३०० टक्क्यांहून अधिक वाढले होते. तसेच जानेवारी २०२०च्या पहिल्या आठवड्यात अॅपच्या नवीन सबस्क्रिप्शनची संख्या पूर्ण महिन्याच्या २५० टक्के अधिक होती. जानेवारी २०१९मध्ये पहिल्या आठवड्यातील रोजच्या सदस्यांमध्ये २९५ टक्के वाढ झाली, तर सबस्क्रिप्शन २४५ टक्क्यांनी वाढले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी