व्हेल माशाची उलटी विकत होता ‘हा’ व्यक्ती, किंमत ऐकून व्हाल थक्क!

व्हायरल झालं जी
Updated Jun 19, 2019 | 22:10 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

अवैधरित्या एम्बरग्रीस म्हणजेच (व्हेलची उलटी) विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांच्यामते एम्बरग्रीसची किंमत जवळपास १.७ कोटी रुपये इतकी होती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरणाबाबत...

Arrest
एम्बरग्रीसची स्मगलिंग करणाऱ्याला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: पोलिसांनी एका ५३ वर्षीय व्यक्तीला एक किलो ३०० ग्रॅम एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाच्या उलटीसह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एम्बरग्रीस विकण्यासाठी जात होता. रिपोर्टनुसार या एम्बरग्रीसची किंमत जवळपास १.७ कोटी रुपये सांगितली जात आहे. एम्बरग्रीस हा एक वसा म्हणजेच वॅक्सी पदार्थ आहे. जो शुक्राणू व्हेलच्या आतड्यांमध्ये एका स्रावच्या रुपात उत्पन्न होतो. हा पदार्थ उष्णकटिबंधीय समुद्रात तरंगतांना आढळतो आणि याचा वापर अत्तर बनविण्यासाठी केला जातो.

रिपोर्टनुसार, पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एका संयुक्त टीमनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीनंतर पोलिसांच्या टीमने शनिवारी विद्याविहार भागात असलेल्या कामा लेन येथे राहुल दुपारे या ५५ वर्षीय व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवून अटक केली. पोलिसांनी सांगितलं, ‘आम्ही एक किलो तीनशे ग्रॅम एम्बरग्रीस ज्याची किंमत १.७ कोटी रुपये आहे, ते जप्त केलंय. एम्बरग्रीस हे बंदी असलेलं सामान आहे. आम्ही वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राहुल दुपारे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.’

स्पर्म व्हेल वन्यजीवन कायद्याअंतर्गत संरक्षित अशी नष्ट होणारी प्रजाती आहे. एम्बरग्रीस दारू, क्लोरोफॉर्म, अत्तर, काही अस्थिर आणि स्थिर तेलांमध्ये विरघळतो.

एम्बरग्रीस (व्हेल उलटी) म्हणजे काय?

एम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी एका दगडा सारखा गोठलेला असतो आणि यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोट्यवधींचे होऊन जाते. संशोधक एम्बरग्रीसला व्हेल माशाची उलटी पण म्हणतात. मात्र काही जण याला व्हेल माशाची विष्ठा म्हणतात. या एम्बरग्रीसला व्हेल मासा पचवू शकत नाही, म्हणून ते कधी तोंडाद्वारे तर कधी रेक्टमद्वारे बाहेर काढून टाकते.

रिपोर्टनुसार, एम्बरग्रीस व्हेल माशाच्या शरीरात त्याच्या सुरक्षेसाठी उत्पन्न होत असतं. त्यामुळे त्याचे आतडे स्क्विड (एक समुद्री जीव)पासून वाचू शकतात. काही संशोधक याला ‘तरंगणारं सोनं’ असंही म्हणतात. याचं वजन १५ ग्रॅमपासून ५० किलोपर्यंत असू शकतं.

कुठे-कुठे होतो एम्बरग्रीसचा वापर

एम्बरग्रीस (व्हेलची उलटी) चा वापर जास्तीतजास्त अत्तर बनविण्यात केला जातो. यापासून बनवलेल्या अत्तराची किंमत खूप जास्त असते. पूर्वी एम्बरग्रीसचा वापर इजिप्तमध्ये अगरबत्ती आणि धूपबत्तीच्या निर्मितीत केला जात होता. तर आता एम्बरग्रीसचा वापर सिगारेटला सुंगधीत करण्यासाठी केला जातो. तर अनेक ठिकाणी एम्बरग्रीसचा वापर औषधांच्या रुपात केला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
व्हेल माशाची उलटी विकत होता ‘हा’ व्यक्ती, किंमत ऐकून व्हाल थक्क! Description: अवैधरित्या एम्बरग्रीस म्हणजेच (व्हेलची उलटी) विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांच्यामते एम्बरग्रीसची किंमत जवळपास १.७ कोटी रुपये इतकी होती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरणाबाबत...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola