Immunity : या जिल्ह्यात वाढला गाढविणीला भाव; दहा हजार रुपये लीटरच्या किमतीमध्ये विकलं जातयं गाढविणीचं दूध

Donkey's milk  For Immunity : महाराष्ट्रा (Maharashtra)च्या हिंगोली (Hingoli) शहरात गाढविणीच्या (Donkey's) दूधाला (Milk) विकलं जात आहे. या दुधातून मानवी शरिरात इम्युनिटी (Immunity ) वाढत असल्याच दावा दूध विकणाऱ्यांकडून केला जात आहे.

Donkey's milk  For Immunity
गाढविणीच्या दुधाला आला भाव; लीटरसाठी मिळताय 10 हजार रुपये   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गाढविणीचं दूध प्यायल्याने कोरोनासारखा रोग बरा होत नाही.
  • हिंगोलीमध्ये गाढविणीचं दूध घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.
  • एका चमचा दुधाची किंमत 100 रुपये असून एक लिटर दूध 10 हजार रुपयांना विकले जाते.

Donkey's milk  For Immunity :  मुंबई :  महाराष्ट्रा (Maharashtra)च्या हिंगोली (Hingoli) शहरात गाढविणीच्या (Donkey's) दूधाला (Milk) विकलं जात आहे. या दुधातून मानवी शरिरात इम्युनिटी (Immunity ) वाढत असल्याच दावा दूध विकणाऱ्यांकडून केला जात आहे. हिंगोलीमध्ये गाढविणीचं दूध घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. दुधासाठी लोक दहा हजार रुपये मोजण्यासही लोक तयार आहेत. कोरोनाने अनेकांना आपला शिकार बनवलं होतं. कोरोनापासून वाचविण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती असणं आवश्यक आहे. यामुळे प्रत्येकजण रोगप्रतिकारशक्ती वाढवू लागला आहे.

'एक चमचा दूध प्यायल्याने सर्व रोगांपासून मुक्ती'

हिंगोलीत गाढवाच्या दुधाची गल्लीबोळात विक्री सुरू असून चमचाभर दूध प्या आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवा असा आवाज उठवला जात आहे. हे चमत्कारिक दूध असून हे पिण्याचे अनेक फायदे आहेत. मुलांना न्यूमोनिया होत नाही. याशिवाय ताप, खोकला, कफ यासारख्या आजारांच्या कोरोना रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गाढविणीचं दूध करते,  असा दावा दूध विक्रेते करत आहेत.

गाढविणीचं दूध प्यायल्याने अनेक रोग दूर होतात

गाढविणीचं दूध विकणारे बालाजी मेसेवाड यांनी सांगितले की, ते ताजे दूध काढून विकतात. हे अनेक आजारांवर गुणकारी आहे. एका चमचा दुधाची किंमत 100 रुपये असून एक लिटर दूध 10 हजार रुपयांना विकले जाते. तसेच गाढवाच्या दुधात त्वचा आणि शरीर दोन्हीसाठी पोषक असतात. बाळाच्या जन्मानंतर तीन दिवसांपर्यंत हे दूध रोज प्यायल्यास आयुष्यभर लाभ होतो. 

डॉक्टर काय म्हणतात?

दुसरीकडे, डॉक्टर व्हीएन रॉज म्हणतात की, गाढविणीचं दूध 10,000 रुपये लिटरने विकले जात आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. गाढविणीचं दूध प्यायल्याने कोरोनासारखा रोग बरा होईल, असे अजिबात नाही.  औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. याप्रमाणे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. पैसे खर्च करू नका, आजारी असाल तर थेट डॉक्टरांकडे जावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी