Viral: ऐकाव ते नवलच! चक्क लाईव्ह सामन्यात कपडे काढून मैदानात आली महिला

व्हायरल झालं जी
Updated Apr 12, 2022 | 18:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Latest Viral News In Marathi | मैदानात कधी काही होईल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. अनेक खेळाडू कधी डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतात तर काही खेळाडूंचा राग चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. मात्र काही चाहतेच उत्साहाच्या भरात खेळाडूंसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. एका लीगमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

In a live match, a woman took off her clothes and came on the field
चक्क लाईव्ह सामन्यात कपडे काढून मैदानात आली महिला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रग्बी लीग सुरू असताना एक महिला टॉपलेस होऊन मैदानात आली.
  • जावोन जोहानसन असे या महिलेचे नाव आहे.
  • पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी महिलेचे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

Latest Viral News In Marathi | नवी दिल्ली : मैदानात कधी काही होईल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. अनेक खेळाडू कधी डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतात तर काही खेळाडूंचा राग चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. मात्र काही चाहतेच उत्साहाच्या भरात खेळाडूंसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. एका लीगमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कारण लाईव्ह सामन्यादरम्यान चक्क एक महिला तिच्या मैत्रीणीच्या सांगण्यावरून मैदानात आली. लक्षणीय बाब म्हणजे तिने मैदानात फक्त प्रवेशच केला नाही तर चांगलाच धुमाकूळ देखील घातला. (In a live match, a woman took off her clothes and came on the field). 

अधिक वाचा : आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन डिग्री घेता येणार

दरम्यान, रग्बी लीग सुरू असताना एक महिला टॉपलेस होऊन मैदानात आली. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात रग्बी लीगच्या Gold Coast Titans विरुद्ध Parramatta Eels या संघांच्या सामन्यादरम्यान घडली. 

कपडे काढून मैदानात आलेल्या महिलेकडे सर्वजण चकीत होऊन पाहत होते. तिला मैदानातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना खूप कष्ट घ्यावे लागले. दरम्यान महिलेने सुरक्षा रक्षकांची देखील हुज्जत घालून मैदानात परतण्याचा प्रयत्न केला. जावोन जोहानसन असे या महिलेचे नाव आहे. तिच्या सोबत आलेल्या तिच्या पार्टनरला याबाबात काहीच कल्पना नव्हती. ती असे काही करेल यावर पार्टनरचाही विश्वास बसत नव्हता. 

Shocking

पोलिसांकडून कारवाईचे संकेत

जावोन जोहानसन या महिलेच्या म्हणण्यानुसार, हे असे कृत्य करायचे आहे हे तिच्या डोक्यात आधीपासूनच होते. त्यामुळे तिला हे असे करायचे कोणी चॅलेंज केले किंवा हे करण्याची संधी दिली तेव्हा त्या संधीचा फायदा घेत तिने हे कृत्य केले. त्यामुळे तिला याबाबत वाईट वाटत नाही. तसेच पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी महिलेचे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या महिलेवर कारवाई होणार की नाही हे पाहण्याजोगे असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी