Girlfriend takes revenge : नवी दिल्ली : तुम्ही अनेक प्रकारच्या प्रेमकथा (Love Affair) ऐकल्या असतील पण एक विचित्र प्रेमकथा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. प्रेमात लोक काहीही करतात. प्रेमवीरांना कसलेच भान राहत नाही याची प्रचिती आपल्याला अनेकवेळा येत असते. मात्र प्रेमप्रकरण पूर्णत्वास न गेल्यास राग आल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे हे प्रेमप्रकरण आहे. सोशल मीडियावर (Social Media) एका मुलीच्या प्रेमकथेने सर्वांनाच धक्का दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एक तरुणी एका तरुणाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण नंतर तिला असे काही कळले ज्यामुळे तिची प्रचंड निराशा झाली. त्या तरुणाने त्याच्या प्रेयसीची फसवणूक एकदा नव्हे तर दोनदा केली. या तरुणीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. पाहूया नेमके हे प्रेमप्रकरण आहे तरी काय आणि त्यात अखेर काय घडले आहे. (In a shocking viral story girlfriend married to father of boyfriend father as he cheated her)
ऑगस्टा हबल (Augusta Hubble) असे या मुलीचे नाव असून ती अमेरिकेत राहते. ती 21 वर्षांची असल्यापासूनच तिचे एका 30 वर्षांच्या तरुणावर प्रेम होते. त्यांचे नाते सुरू होताच, सर्वकाही व्यवस्थित होते. मुलीच्या म्हणण्यानुसार, मुलगा फुले आणायचा, भेटवस्तू द्यायचा आणि लग्नाबाबत विचारणाही करायचा.
एका व्हिडिओमध्ये या तरुणीने सांगितले की या दोघांचे नाते 2 वर्षे टिकले पण नंतर मुलीला समजले की मुलगा तिची फसवणूक करत आहे. वास्तविक हा मुलगा मुलीच्या मैत्रिणीसोबत संबंध ठेवत मुलीची फसवणूक करत होता. मुलीच्या प्रियकरानेही ही गोष्ट मान्य केली. मुलीने मुलाला दुसरी संधीही दिली पण मुलगा पुन्हा रंगेहाथ पकडला गेला.
अधिक वाचा : Shocking! पुराच्या पाण्यात गाडी गेली वाहून, LIVE VIDEO आला समोर
दोनदा फसवणूक केल्यानंतर तरुणीने प्रियकरासोबत ब्रेकअप केले. यानंतर मुलीने प्रियकराच्या वडिलांना पसंत केले आणि त्यांच्यासोबत लग्न केले. एका TikTok व्हिडिओमध्ये, हबलने सांगितले की तिने तिच्या माजी प्रियकराच्या वडिलांसोबत तिच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला आणि आता ही तरुणी आपल्या पतीसोबत खूप आनंदात आहे.
सोशल मीडियावर अनेक गंमतीशीर, विचित्र, भारावून टाकणारे, अद्भूत, लक्ष वेधून घेणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल होत असतात. सोशल मीडियाची ताकद आणि व्याप्ती इतकी प्रचंड आहे की काही तासात या पोस्ट किंवा व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतात आणि व्हायरलदेखील होतात. प्रेमप्रकरण, तरुण-तरुणींच्या मैत्रीसारखे विषय तर सर्वानाच आकर्षित करत असतात. त्यात प्रेयसीने जर अशा प्रकारे निर्णय घेत बदला घेण्यासाठी लग्न केले असेल आणि टिकटॉकवर व्हिडिओ बनवून शेअर केला असेल तर तो व्हायरल स्वाभाविकच आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे.