Viral Emotional Video: मरणाऱ्या बापाची मुलीने पूर्ण केली शेवटची इच्छा, इंजेक्शनद्वारे दिली दारू!

Viral Video of father & daughter : वडील आणि मुलीचे नाते (Father-Daughter relationship)हे खूप खास असते. मुलींचा आपल्या वडिलांमध्ये जर जास्तच जीव असतो. तर आपल्या लाडक्या लेकीसाठी वडील कुठलीच कमतरता ठेवत नाहीत. वडील त्यांच्या मुलींचे खूप संरक्षण करतात. आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील खूप कष्ट करतात. पण जेव्हा मुली असे काही करतात तेव्हा कोणीही भावूक होऊ शकते. असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत असून सोशल मीडिया (Social Media)यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतो आहे.

viral video of dieing father & daughter
मरणारा बाप आणि मुलीचा व्हायरल व्हिडिओ 
थोडं पण कामाचं
  • वडील आणि मुलीचे नाते हे खूप खास असते
  • वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
  • बापाच्या इच्छेसाठी मुलीने मरणाऱ्या बापाला इंजेक्शनद्वारे दिली रम

Daughter-Father Relationship Video : कॅनबेरा : वडील आणि मुलीचे नाते (Father-Daughter relationship)हे खूप खास असते. मुलींचा आपल्या वडिलांमध्ये जर जास्तच जीव असतो. तर आपल्या लाडक्या लेकीसाठी वडील कुठलीच कमतरता ठेवत नाहीत.  वडील त्यांच्या मुलींचे खूप संरक्षण करतात. आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील खूप कष्ट करतात. पण जेव्हा मुली असे काही करतात तेव्हा कोणीही भावूक होऊ शकते. असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत असून सोशल मीडिया (Social Media)यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतो आहे. या व्हिडिओमागची कहाणी अधिक भावूक असणार आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील (Australia Video) असल्याचे सांगितले जात आहे आणि हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला आहे. (In an emotional viral video, daughter gave injection of rum to deing father)

अधिक वाचा : Optical Illusion:या ऑप्टिकल इल्युजनमध्ये भंगारामध्ये एक गोंडस मांजर लपले आहे, बहुतांशांना सापडत नाही, पाहा तुम्हाला सापडंतय का?

वडिलांना शेवटची इच्छा म्हणून दिली दारू

'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, वडील गंभीर आजारी होते आणि रुग्णालयात ते शेवटचे श्वास घेत होते. वडिलांना रम प्यायची आवड होती. म्हणूनच मुलीने वडिलांना रमचे इंजेक्शन देऊन वडिलांची इच्छा पूर्ण केली. काही तासांनंतर वडिलांचा मृत्यू झाला.

अधिक वाचा : Viral Video : असा बॉयफ्रेंड नको गं बाई! प्रियकर आला जोशात...प्रेयसीबरोबर करायला गेला स्टंट आणि प्रेयसीला घडली अद्दल, पाहा व्हिडिओ

व्हिडिओचा भावनिक कॅप्शन

मुलीचे नाव पेनोलोप अन असे सांगितले जात आहे. तुमच्या माहितीसाठी की त्याने त्याच्या वडिलांना त्याची आवडती बुंडाबर्ग रम प्यायला लावली. व्हिडिओमध्ये दिसते आहे की, वडील हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले आहेत आणि मुलगी त्यांच्या बाजूला शांतपणे उभी आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मरण्यापूर्वी मुलीने वडिलांना त्याच्या आवडत्या पेयाचा शेवटचा घोट दिला.

अधिक वाचा : घोड्यावरून नववधूची एंट्री: नवरीबाईचा स्वॅग पाहून वऱ्हाडीही झाले भलतेच खुश

व्हिडिओ व्हायरल झाला

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि कथा जाणून घेतल्यानंतर प्रत्येकजण खासकरून सोशल मीडियावर (Social Media Users)हा व्हिडिओ पाहणारे लोक खूप भावूक झाले. वडिलांनी हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांना रम खूप आवडते. बाप आणि मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली.

एरवीही मुलीचे आपल्या वडिलांशी असणारे नाते काही वेगळेच असते. अशावेळी जर आपले वडीलच मृत्यूशय्येवर असतील तर त्या बापाची आणि मुलीची भावनिक स्थिती कशी असेल याची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. ती परिस्थिती आणि वडिलांचे मुलीशी असलेले नाते, त्यातील प्रेम या भावना सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकापर्यत नेमक्या पोचत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून व्हिडिओ पाहणारे इमोशनल होत आहेत. असे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. भावनिक किंवा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे दर्शवणारे व्हिडिओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेत असतात.

सोशल मीडियावर असे भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. हातात स्मार्टफोन आणि सोशल मीडिया असल्यावर अशा व्हिडिओंना व्हायरल होण्यास वेळ लागत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी