Viral: आरारा खतरनाक! बिहारमध्ये रेल्वे चालकाला आली दारूची तलफ; रेल्वे मध्येच थांबवून झाला गायब 

व्हायरल झालं जी
Updated May 04, 2022 | 10:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bihar addict train driver । बिहारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, मात्र समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनच्या चालकाने दारू पिण्यासाठी बराच वेळ ट्रेन थांबवली. हसनपूर येथे साधारणपणे दोन मिनिटांचा थांबा असलेली ट्रेन सोमवारी संध्याकाळी तासभर उभी होती.

In Bihar, a train driver stopped a train for drink alcohol 
बिहारमध्ये रेल्वे चालकाला आली दारूची तलफ, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिहारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनच्या चालकाने दारू पिण्यासाठी बराच वेळ ट्रेन थांबवली.
  • करमवीर यादव हा हसनपूर येथील लोकल ट्रेनचा चालक असल्याचे उघड झाले.

Bihar addict train driver । पाटना : बिहारमध्ये दारूवर पूर्णपणे बंदी (liquor ban) घालण्यात आली आहे, मात्र समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर रेल्वे स्थानकावर एका लोकल ट्रेनच्या चालकाने दारू पिण्यासाठी बराच वेळ ट्रेन थांबवली. हसनपूर येथे साधारणपणे दोन मिनिटांचा थांबा असलेली ट्रेन सोमवारी संध्याकाळी तासभर उभी होती. प्रवाशांनी केलेल्या गोंधळानंतरच रेल्वे अधिकाऱ्यांना चालकांच्या या प्रकरणाची माहिती मिळाली. (In Bihar, a train driver stopped a train for drink alcohol). 

पॅसेंजर ट्रेन क्रमांक ०५२७८ सोमवारी संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी समस्तीपूर रेल्वे स्टेशनवरून निघाली आणि हसनपूरला ५.४५ वाजता पोहोचली. ट्रेनचे शेवटचे स्थानक सहरसा आहे, जिथे ती रात्री ८.३० वाजता पोहोचते. हसनपूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर मनोज कुमार चौधरी यांनी म्हटले की, "जेव्हा प्रवासी रेल्वे स्थानकावर गोंधळ घालत होते, तेव्हा आम्ही ड्रायव्हरच्या केबिनमध्ये गेलो. तेव्हा चालक करमवीर यादव उर्फ ​​मुन्ना इंजिन रूममधून बेपत्ता होता. 

अधिक वाचा : मुंबईतील ८०३ मशिदींना लाऊडस्पीकरची परवानगी, पोलिसांनी दिली

हसनपूर बाजारात मद्यधुंद अवस्थेत चालकाने घातला गोंधळ

त्यांनी म्हटले, "हसनपूर मार्केटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती गोंधळ घालत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तिथे पोहचल्यावर आम्ही त्याला अटक केली. करमवीर यादव हा हसनपूर येथील लोकल ट्रेनचा चालक असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून दारूची अर्धी बाटलीही जप्त केली आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

अखेर दुसऱ्या चालकाने ट्रेनला तिथून हलवले

या घटनेनंतर समस्तीपूर झोनचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) आलोक अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली. करमवीर यादव मद्यधुंद अवस्थेत सापडल्यानंतर तेथीलच एक लोको पायलट व्ही.सी. रजेवर जात होता योगायोग असा की तो याच ट्रेनमधून प्रवास करत होता. दरम्यान सुट्टीवर जात असलेल्या राजकुमारने सहरसाला जात असताना अखेर ही ट्रेन स्थानकावरून ६.४५ वाजतान हलवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी