Viral Video: पती हॉटेल रूममध्ये प्रेयसीसोबत करत होता रासलीला, तेव्हाच पत्नी पोहोचली अन्...

wife beaten husband Viral Video: आग्रा येथील एका हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत डान्स करत असताना पतीने पत्नीला रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

in hotel room husband was doing rasleela with girlfriend then wife reached and then beaten husband with slippers
पती हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत करत होता रासलीला, पत्नी पोहोचली..  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सोमवारी रात्री आग्रामधील एका हॉटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
  • पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून संतापली पत्नी
  • महिला आणि तिच्या पतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral News: आग्रा: आग्रा (Agra) येथील एका हॉटेलमध्ये (Hotel) पती-पत्नीचा  (Husband-Wife)हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. येथे पत्नीने हॉटेलमध्ये पतीला दुसऱ्याला एका महिलेसोबत रासलीला करताना रंगेहात पकडले. पत्नी जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिचा पती हा प्रेयसीसह हॉटेलच्या रुममध्ये उपस्थित होता. हे चित्र पाहताच पत्नीचा पारा प्रचंड चढला. पत्नी एवढी संतापली की, पत्नीने थेट पतीला चप्पलने मारहाण सुरू केली. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या प्रेयसीला देखील सोडले नाही. तिला देखील चांगलाच महिलेने बराच चोप दिला. दरम्यान, हॉटेलमधील हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (in hotel room husband was doing rasleela with girlfriend then wife reached and then beaten husband with slippers)

प्रेयसीसोबत हॉटेलच्या रुमवर गेला होता पती

हा हायव्होल्टेज ड्रामा पोलीस ठाण्याच्या हरिपर्वत परिसरातील एका हॉटेलमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे एक व्यक्ती आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला होता. हा प्रकार त्याच्या पत्नीला कुठूनतरी समजला. त्यानंतर पत्नीने तात्काळ आपल्या भावाला सोबत घेतलं आणि थेट हॉटेलमध्ये जाऊन धडकली. 

अधिक वाचा: Love Story: 50 वर्षीय महिला 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली आणि मग....

यावेळी पत्नीने हॉटेलच्या रुममध्ये घुसत आपला संताप व्यक्त करत पती आणि त्याच्या प्रेयसीला चोप दिला. यावेळी पत्नीचा संताप एवढा अनावर झाला होता की, तिने पती आणि त्याच्या प्रेयसीला थेट चप्पलने बेदम मारहाण केली. बराच वेळ हॉटेलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा असाच सुरू होता.

अधिक वाचा: Monkey attack: माकडांशी घेतला पंगा, पूर्वजांनी दिला प्रसाद! पाहा व्हिडिओ

16 वर्षीय मुलीच्या बाप आहे आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती एका नर्सिंग होममध्ये काम करतो. त्यांना एक 16 वर्षांची मुलगीही आहे. पतीच्या कृत्याला कंटाळून महिला माहेरी राहत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पत्नी पती आणि त्याच्या मैत्रिणीला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. पती माफी मागत राहिला मात्र पत्नी त्याला सतत चोप देत होती. घटनेच्या वेळी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. आग्रा येथील हॉटेल रूममध्ये दुसऱ्या महिलेसोबत पकडल्यानंतर पत्नीने आता आपल्या पतीविरोधात पोलिसात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे आता पतीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी