Viral Video: भररस्त्यात धिंगाणा घालत तरूणीने केली डिलिव्हरी बॉयला मारहाण, व्हिडिओ व्हायरल 

व्हायरल झालं जी
Updated Apr 18, 2022 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video । सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी भररस्त्यात धिंगाणा घालत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे डिलिव्हरी बॉयला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.

In Jabalpur, Madhya Pradesh, a young woman beat up a delivery boy
भररस्त्यात धिंगाणा घालत तरूणीने केली डिलिव्हरी बॉयला मारहाण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • एक मुलगी भररस्त्यात धिंगाणा घालत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत आहे.
  • हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील जबलपूरचा आहे.

Viral Video । मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी भररस्त्यात धिंगाणा घालत डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे डिलिव्हरी बॉयला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. सर्व लोक तमाशा पाहत राहिले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. (In Jabalpur, Madhya Pradesh, a young woman beat up a delivery boy). 

अधिक वाचा : दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोरोनाच्या विळख्यात

माहितीनुसार, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी डिलिव्हरी बॉयला कशी चपलेने मारहाण करत आहे. दरम्यान रसेल चौकाजवळ डिलिव्हरी बॉयची बाईक तरूणीच्या स्कूटीला धडकली. त्यामुळे मुलीला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर मुलीला राग अनावर झाला आणि तिने डिलिव्हरी बॉयला भररस्त्यात मारहाण करायला सुरूवात केली. काही लोकांनी मुलीला रोखण्याचाही प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे, मात्र तिने कोणाचेही ऐकले नाही. आधी मुलीने डिलिव्हरी बॉयला बुटाने मारले आणि नंतर लाथांनी तुडवण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

भररस्त्यात तरूणीने घातला धिंगाणा

तरुणीचा हा हायव्होल्टेज ड्रामा काही वेळ चालू राहिला. ही घटना घडली तेव्हा तरुणी फोनवर बोलत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र ही तरुणी कोण आहे, याची अद्याप ओळख पटलेली नाही. हा सगळा प्रकार एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथे ओमटी पोलीस ठाण्याचे प्रभारी एसपीएस बघेल यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत अद्याप आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. पण या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी