डॉगीचे शेजारच्या कुत्र्याशी 'अनैतिक संबंध' असल्याचा संशय, मालकाने डॉगीला काढलं घराबाहेर 

व्हायरल झालं जी
Updated Jul 24, 2019 | 22:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pomeranian illicit relation: केरळमध्ये एका मालकाने आपल्या डॉगीला यासाठी घराबाहेर काढलं आहे की, त्याला असं संशय होता की, त्याच्या डॉगीचे शेजारच्या कुत्र्याशी अनैतिक संबंध आहेत. 

dog_letter_facebook
अनैतिक संबंध असल्याचा संशय, मालकाने कुत्र्याला काढलं घरबाहेर  |  फोटो सौजन्य: Facebook

तिरुवनंतपुरम (केरळ):  Pomeranian illicit relation आपण अनेकदा माणसांच्या अनैतिक संबंधांबाबत ऐकतो. त्यातून होणारे गुन्हे देखील आपल्याला समजतात. पण आपण कधी एखाद्या श्वानाच्या अनैतिक संबंधाबाबत ऐकलं आहे? हे वाचून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. पण ही गोष्ट पूर्णत: खरी आहे. त्याचं झालं असं की, केरळमध्ये एक बातमी समोर आली आहे. जिथे एका पोमेरियन श्वानाला त्याच्या मालकाने थेट घराबाहेर हाकलून दिलं आहे. त्या कुत्र्याच्या मालकाचं असं म्हणणं आहे की, त्याच्या 'डॉगी'चे अनैतिक संबंध होते. त्यामुळेच आपण त्याला घरातून हाकलून दिलं आहे. 

डॉगीच्या गळ्यात अडकवली चिठ्ठी

रिपोर्टनुसार, तिरुवनंतपुरमच्या छकई येथील वर्ल्ड बाजारात एक श्वान हा फिरताना दिसून आला. ३ वर्षाच्या या श्वानाला 'प्पूपिल फॉर एनिमल' या संस्थेच्या स्वयंसेविका शमीम फारुखी यांनी पाहिलं. शमीमने या श्वानच्या गळ्याजवळ एक चिठ्ठी पाहिली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर शमीमला खरं तर धक्काच बसला. रिपोर्टनुसार, त्या चिठ्ठीमध्ये असं लिहलं होतं की, 'हा खूप चांगला डॉगी आहे. याला जास्त खाणं द्यावं लागत नाही. हा कधीही आजारी पडत नाही. याला फक्त ५ दिवसातून एकदाच आंघोळ घालावी लागते.' 

'शेजारील कुत्र्याशी होते अनैतिक संबंध'

चिठ्ठीत पुढे असं लिहलं होतं की, 'डॉगी आतापर्यंत कुणालाही चावलेला नाही. याला अंडी, दूध आणि बिस्किट खाण्यासाठी देतो. पण आम्ही या डॉगीला घराबाहेर काढलं आहे कारण की, त्याचे शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध होते.'  

फेसबुकवर शेअर केली पोस्ट

स्वयंसेविका शमीम फारुखी हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर डॉगीच्या फोटोसोबत ती चिठ्ठी देखील पोस्ट केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये असंही लिहलं आहे की, 'डॉगी नेहमीच असं करतात. पण याच्या मालकाला जर डॉगीचं ब्रीड करायचं नसेल तर नसबंदी नावाची देखील एक गोष्ट असते. जर मालकाला आपल्या डॉगीला व्हर्जिनच ठेवायचं असेलत त्याने त्याला घरातच कैद करुन ठेवावं.' 

'मुलांच्या नशीबात काय असेल?' 

शमीम यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली. त्यानंतर पशू अधिकारी कार्यकर्ता श्रीदेवी कार्तान यांनी याबाबत फेसबुकवर अतिशय परखड मत मांडलं. 'ज्या कोणी ही चिठ्ठी लिहली आहे मी त्याच्या मुलांसाठी चिंतित आहे. त्याच्या मुलांचं नशीब कसं असेल? जर त्याच्या मुलांनी दुसऱ्या कोणासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचं आयुष्य धोक्यात टाकतील.' 

यासोबतच त्यांनी अतिशय उपरोधिकपणे असंही लिहलं की, 'जर आपल्या कुत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारे कायदेशीर संबंध दिसत असेल तर या आपण त्यांची कुंडली पाहून आपल्या कुत्र्याच्या लग्नाची व्यवस्था करु. आम्ही हुंड्याबाबत समझोता करुन आपल्या अनैतिक संबंधाची समस्या देखील सोडवू शकतो. अशा पद्धतीने आपण मन: शांती प्राप्त करु शकता.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी