Viral News : आश्चर्यकारक! तीन वर्षांच्या मुलीला केले मृत घोषित, अंत्यसंस्कारात झाली जिवंत, काही तासांनंतर पुन्हा मृत...

Shocking Story : एका तीन वर्षाच्या मुलीच्या बाबतीत एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. आधी या तीन वर्षांच्या मुलीला (3 Year girl died) प्रथम मृत घोषित करण्यात आले. मात्र ती अंत्यसंस्काराच्या वेळी जिवंत झाली आणि काही तासांनंतर तिचा पुन्हा मृत्यू झाला. हे अत्यंत धक्कादायक प्रकरण मेक्सिकोचे (Mexico Viral News) आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल (Viral) होते आहे. डॉक्टरांनी चुकून मुलीला मृत घोषित केले होते. पण नंतर जे घडले ते कल्पनेपलीकडचे होते.

Viral News
व्हायरल बातमी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तीन वर्षाच्या मुलीच्या बाबतीत एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार घडला
  • हे अत्यंत धक्कादायक प्रकरण मेक्सिकोचे (Mexico Viral News) असून हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतंय
  • डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुरडीचा बळी

Viral News : नवी दिल्ली : एका तीन वर्षाच्या मुलीच्या बाबतीत एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. आधी या तीन वर्षांच्या मुलीला (3 Year girl died) प्रथम मृत घोषित करण्यात आले. मात्र ती अंत्यसंस्काराच्या वेळी जिवंत झाली आणि काही तासांनंतर तिचा पुन्हा मृत्यू झाला. हे अत्यंत धक्कादायक प्रकरण मेक्सिकोचे (Mexico Viral News) आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल (Viral) होते आहे. डॉक्टरांनी चुकून मुलीला मृत घोषित केले होते. पण जेव्हा तिला अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले तेव्हा ती जिवंत असल्याचे आढळून आले. एल युनिव्हर्सल या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 ऑगस्ट रोजी मेक्सिकोच्या विला डी रामोसमध्ये घडली आहे. कॅमिला रोक्साना मार्टिनेझ मेंडोझा असे मृत मुलीचे नाव आहे. मुलीच्या आईने स्थानिक रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. हॉस्पिटलने आपल्याला सांगितले होते की आपली मुलगी मरण पावली आहे, असे आईने म्हटले आहे. मात्र नंतर जे काही घडले ते अत्यंत धक्कादायक आहे. (In shocking viral news, girl first declared dead then found alive then she died) 

अधिक वाचा : कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही हे तिन्ही आजार एकाचवेळी झाले, उपचार सुरू

आधी मुलीला दाखल केले रुग्णालयात

मुलीला पोटदुखी, उलट्या आणि तापाचा त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. स्थानिक बालरोगतज्ञांनी मुलीची आई मेरी जेन मेंडोझो यांना तिला मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी तीन वर्षांच्या मुलीला डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी पॅरासिटामोलचे प्रिस्क्रिप्शन दिले. आईने प्रसार माध्यमांनाम माहिती देताना सांगितले की कॅमिलाची प्रकृती खराब झाल्यामुळे तिने मुलीला दुसऱ्या डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी दुसरे औषध दिले आणि आईला रुग्ण मुलीला फळे आणि पाणी देण्यास सांगितले.

मात्र मुलीच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी मुलीला रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल केले. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीत म्हटले आहे की, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीला ऑक्सिजन देण्यासाठी बराच वेळ लागला. मुलीला अंतस्नायु द्रव दिल्यानंतर 10 मिनिटांनी, डॉक्टरांनी मुलीचे उपचार बंद केले. यानंतर डॉक्टर मेंडोझोला म्हणालेत की ते मुलीला वाचवू शकत नाहीत.

अधिक वाचा : Tongue color: जिभेचा रंग सांगतो तुमच्या आरोग्याची स्थिती, वाचा कुठल्या रंगाचा काय अर्थ

अंत्यसंस्काराच्या वेळी जिवंत होती

डॉक्टरांनी मुलीच्या मृत्यूचे अधिकृत कारण डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे हे सांगितले. दुसऱ्या दिवशी, अंत्यसंस्कारासाठी नेले असता, मुलीची आई म्हणजे मेंडोझाच्या लक्षात आले की तिच्या मुलीच्या शवपेटीवरील काचेचे झाकण गूढपणे वाफेत गोठले होते. जणूकाही काचेखाली कोणीतरी श्वास घेत आहे. तिने ही बाब आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आणून दिली. सुरुवातीला तिथे उपस्थित लोकांनी तिचे म्हणणे धुडकावून लावले. त्यांचे म्हणणे होते की आई असल्याने ती आपल्या मुलाचा मृत्यू सहन करू शकत नाही, म्हणून ती असे बोलते आहे. पण मुलीच्या आजीने कॅमिलाचे डोळे हलताना पाहून शवपेटी उघडली आणि तिची नाडी चालू असल्याचे दिसले.

अधिक वाचा : Automobile Update : मारुतीच्या या स्वस्त 7 सीटर कारला प्रचंड मागणी! 26 किमीचा मायलेज आणि किंमत फक्त एवढी

प्रशासनाकडून तपास सुरू

समोर आलेल्या माहितीत म्हटले आहे की मुलीला पुन्हा रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला जिवंत करण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांनी तिला पुन्हा मृत घोषित केले. यावेळी मृत्यूचे कारण सेरेब्रल एडेमा (मेंदूला सूज) असे देण्यात आले. मुलीच्या आईने आता मुलीला मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईने म्हटले आहे की तिचे डॉक्टरांशी कोणतेही वैर नाही, मात्र अशी घटना "पुन्हा घडू नये" अशी तिची इच्छा आहे. मेक्सिसोमधील स्थानिक प्रशासनाने या सर्व घटनेचा तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी