Viral: चालू कार्यक्रमातच मंत्री महोदयांनी काढली डुलकी; व्हिडीओ व्हायरल

Pradhuman Singh Viral Video | सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा होत असते. काही गोष्टी खूप हास्यास्पद असतात तर काही गोष्टी हैरान करून सोडतात.

In the current program, Minister Pradhuman Singh took a sleep
चालू कार्यक्रमातच मंत्री महोदयांनी काढली डुलकी, पाहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा अंदाज लावणे देखील खूप कठीण आहे
  • मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे स्टेजवर झोपलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
  • उर्जामंत्र्यांवर आता कॉंग्रेसने निशाणा साधला आहे.

Pradhuman Singh Viral Video | नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा होत असते. काही गोष्टी खूप हास्यास्पद असतात तर काही गोष्टी हैरान करून सोडतात. प्रकरण कोणतेही असो सोशल मीडियावरील युजर्स याचा पुरेपुर आनंद घेतात. याचदरम्यान मध्यप्रदेशच्या एका मंत्री महोदयांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते झोपलेले दिसत आहेत. चला तर मग जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (In the current program, Minister Pradhuman Singh took a sleep).

अधिक वाचा : सीबीआयचे दिल्ली-पाटणासह लालू यादवांच्या 17 ठिकाणांवर छापे

भाजपच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमातील प्रकार 

माहितीनुसार, मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे स्टेजवर झोपलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित होते. मंत्र्यांच्या झोपलेल्या फोटोंवरून काँग्रेस टोमणे मारत आहे. गुरुवारी शिवपुरीमध्ये भाजपकडून कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर मंचावर झोपलेले दिसले. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर मंचावरच डुलकी काढताना दिसत आहेत. 

व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी 

ऊर्जामंत्री तोमर हे व्यासपीठावर झोपले असल्याच्या फोटोसोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे मीडिया समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी लिहिले आहे की, आता ऊर्जामंत्र्यांनीही काय करावे, दिवसा कार्यक्रमात का झोपू नये. आता रात्री वीज नसते, त्यामुळे रात्री झोपायचे कसे? त्यामुळे झोप दिवसाच पूर्ण करावी लागेल. अशा शब्दांत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी