Viral: ऐकावं ते नवलच! भारतातील या गावात उलट्या दिशेने चालते घड्याळ; १२ वाजल्यानंतर वाजतात ११ 

व्हायरल झालं जी
Updated Jun 18, 2022 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Clock Runs In Opposite Direction । भारतात आणि जगात असे अनेक समुदाय आहेत, जे सामान्य माणसांपेक्षा वेगळ्या चालीरितींवर विश्वास ठेवतात. काही ठरावीक समाजातील लोकांच्या काही रूढी, परंपरा इतर समजांपेक्षा खूपच वेगळ्या असतात.

In this village in India, Clock Runs In Opposite Direction 
ऐकावं ते नवलच! भारतातील या गावात उलट्या दिशेने चालते घड्याळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गोंड आदिवासी समाज छत्तीसगडमध्ये राहतो.
  • गोंड समाजाचे लोक उलट्या दिशेने चालणार घड्याळ मानतात.
  • छत्तीसगडमधील गोंड समुदायाव्यतिरिक्त, इतर २९ समुदाय देखील गोंडवाना टाइमचे पालन करतात.

Clock Runs In Opposite Direction । मुंबई : भारतात आणि जगात असे अनेक समुदाय आहेत, जे सामान्य माणसांपेक्षा वेगळ्या चालीरितींवर विश्वास ठेवतात. काही ठरावीक समाजातील लोकांच्या काही रूढी, परंपरा इतर समजांपेक्षा खूपच वेगळ्या असतात. दरम्यान असाच एक प्रकार समोर आला आहे. भारताच्या छत्तीसगड राज्यात एक समुदाय राहतो, जो भारतीय परंपरा आणि जगाच्या चालीरीतींपेक्षा काही वेगळ्याच गोष्टींचे पालन करतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावात उलट्या दिशेने घड्याळ चालते, अर्थात या गावात घड्याळ विरूद्ध दिशेने फिरते. (In this village in India, Clock Runs In Opposite Direction). 

अधिक वाचा : कृषी कायद्यांप्रमाणे अग्निपथ योजना देखील मागे घ्यावी लागेल

अनोखी प्रथा मानणारा समुदाय

ज्या गावात हा समाज राहतो त्या गावात घड्याळात १२ वाजल्यानंतर १ वाजत नाही तर चक्क ११ वाजतात. लक्षणीय बाब म्हणजे जगातील सर्व घड्याळे डावीकडून उजवीकडे धावतात आणि १२ वाजल्यानंतर एक, दोन आणि तीन वाजतात. मात्र छत्तीसगडच्या या गावात घड्याळ उजवीकडून डावीकडे धावते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावात जेव्हापासून घड्याळं आली आहेत तेव्हापासून येथील घड्याळे उलट्या दिशेने चालतात. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील आदिवासी शक्तीपीठाशी संबंधित गोंड आदिवासी समाजातील लोक अशा अनोख्या परंपरेवर विश्वास ठेवतात. 

हा समाज नेहमी घड्याळाकडे त्याच्या उलट्या दिशेने पाहतो. लक्षणीय बाब म्हणजे या समाजातील लोक त्यांच्या घड्याळाला गोंडवाना टाइम या नावाने ओळखतात. खर तर पृथ्वी उजवीकडून डावीकडे फिरते असा या समाजाचा विश्वास आहे. सूर्यापासून चंद्रापर्यंत आणि तारेही याच दिशेने फिरतात, अशी समाजाची धारणा आहे.

छत्तीसगढ मधील ३० समुदाय करतात या नियमांचे पालन 

याशिवाय तलावात पडणारा भोवराही उजवीकडून डावीकडे फिरतो, अशी समाजाची धारणा आहे. त्यामुळे या समाजातील लोकांनी घड्याळाची दिशा उजवीकडून डावीकडे ठेवली आहे. तसेच छत्तीसगडमधील गोंड समुदायाव्यतिरिक्त, इतर २९ समुदाय देखील गोंडवाना टाइमचे पालन करतात. निसर्गाचे चक्र ज्या दिशेने फिरते, त्याच दिशेने घड्याळही फिरते, अशी या सर्व समाजातील लोकांची धारणा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी